पाऊस कोकणातून पुढे सरकणार कधी? मुंबई, मध्य महाराष्ट्राला दीर्घ प्रतीक्षा

By admin | Published: June 24, 2017 04:17 AM2017-06-24T04:17:20+5:302017-06-24T04:17:49+5:30

कोकणातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि घाटमाथ्यावरील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे

When the rain is going to move from the corner? Long wait for Mumbai, Central Maharashtra | पाऊस कोकणातून पुढे सरकणार कधी? मुंबई, मध्य महाराष्ट्राला दीर्घ प्रतीक्षा

पाऊस कोकणातून पुढे सरकणार कधी? मुंबई, मध्य महाराष्ट्राला दीर्घ प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोकणातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि घाटमाथ्यावरील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मुंबई तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग मात्र अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
पाऊ स सुरूच न झाल्याने अनेक भागांत पेरण्या रखडल्या आहेत. मृग नक्षत्रात पेरण्या केल्या जातात. पण यंदा मृग संपला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या वर्षी राज्यात सर्वदूर चांगला पाऊ स झाल्यामुळे आतापर्यंत राज्याच्या ग्रामीण भागांत पाण्याची टंचाई फारशी भासलेली नाही. पण आता तो सुरू झाला नाही, तर जुलैमध्ये ते संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबईत ७ ते १0 जून या काळात मान्सूनचे आगमन होते. यंदा आगमन लांबले. सुरुवातीला २ ते ५ जून या काळात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण तो तेव्हा पडला नाही आणि आताही मुंबईच्या एखाद दुसऱ्या भागात तुरळक सरी पडत असून, संपूर्ण शहरात अद्याप सलग पाऊ स पडलेलाच नाही. कोकणात अडकलेला पाऊ स अद्याप मुंबईकडे आणि राज्याच्या अन्य भागांत हवा तसा सरकलेला नाही. तो कधी सरकेल, याचा स्पष्ट अंदाजही वर्तवण्यात आलेला नाही.
राज्यात मध्य महाराष्ट्रातील गेल्या काही भागांमध्ये २४ तासांत तुरळक पाऊस झाला. लोहगाव, अलिबाग, अकोला येथे प्रत्येकी ३ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर येथे १४ मिलिमीटर पाऊस झाला. तर, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील पारोळा येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस झाला.
पाऊस न सुरू झाल्याने शहरी भागाचे तापमान चांगलेच वाढले आहे़ मे महिन्यात होणाऱ्या उकाड्यापेक्षा अधिक उकाडा होत आहे़ त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़. 

 

काही भागांमध्ये पाऊस : कोकणातील माथेरान येथे ७०, पनवेल ६०, पेण, उरण प्रत्येकी ४०, खालपुर, कुडाळ, रोहा, वेंगुर्ला येथे प्रत्येकी ३०, अलिबाग, डहाणू, जव्हार, कणकवली, मंडणगड, मुंबई, मुरबाड, सुधागड, तलासरी, उल्हासनगर येथे २० मिलिमीटर पाऊस झाला. भिरा, चिपळूण, देवगड, कल्याण, कर्जत, मालवण, माणगांव, म्हापसा, म्हसळा, राजापूर, देवरुख, सावंतवाडी आणि वाडा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस झाला. घाटमाथा क्षेत्रातील शिरगाव येथे ६०, ताम्हिणी ५०, दावडी ४०, डुंगरवाडी, आंबोणे ३०, लोणावळा, वळवण, भिवपुरी, खोपोली येथे प्रत्येकी २०, भिरा, कोयना, खंद येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस झाला.

Web Title: When the rain is going to move from the corner? Long wait for Mumbai, Central Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.