Sharad Pawar Jayant Patil: "शरद पवार जेव्हा 'स्वतः तिकडे येतो' म्हणाले तेव्हा कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 07:39 PM2022-12-09T19:39:44+5:302022-12-09T19:40:48+5:30

जयंत पाटील यांचा दावा, शिंदे-फडणवीस सरकारवर केली टीका

"When Sharad Pawar said 'savat tanda', there was a mildness in the language of Karnataka" | Sharad Pawar Jayant Patil: "शरद पवार जेव्हा 'स्वतः तिकडे येतो' म्हणाले तेव्हा कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली"

Sharad Pawar Jayant Patil: "शरद पवार जेव्हा 'स्वतः तिकडे येतो' म्हणाले तेव्हा कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली"

Next

Sharad Pawar Jayant Patil, Maharashtra Karnataka Border Dispute: राज्यात घडणाऱ्या सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. पण शरद पवार जेव्हा 'स्वतः तिकडे येतो' म्हणाले तेव्हा कर्नाटकच्या भाषेत नरमाई आली, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. "महाराष्ट्रावर अशा प्रकारचे संकट असताना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गप्प बसल्याचे राज्यातील जनतेने कधीच पाहिले नाही. सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे ते कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत. हीच समस्या महाराष्ट्राच्या मनात आहे", असे जळजळीत टीका जयंत पाटील यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर केली.

"गुरुवारी सकाळी सीमा भागातील लोकांशी संपर्क साधल्यानंतर शरद पवारांनी तिथे शांतता असल्याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी काही घटना घडल्या. त्याचा स्वतंत्रपणे विचार होईलच. पण शरद पवार 'स्वतः तिकडे येतो' म्हटल्यावर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आलेली आहे. त्यांनाही लक्षात आले आहे की काय होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनता सीमा भागात आहे. त्या जनतेला त्रास दिला तर महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा आहे हा एक मोठा संदेश शरद पवारांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आता जास्त अनुचित प्रकार करण्याचे धाडस त्यांचे होणार नाही," असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

"सीमा प्रश्नात महाराष्ट्रातील मराठी लोकांना तिथे त्रास होतो आहे, हल्ले होत आहेत त्याबद्दल आवाज उठवायला लोकसभेत संधी दिली जात नाही म्हणजे केंद्र सरकारने एवढे एकाबाजूने काम करणे योग्य नाही. सीमा भागातील वादाबाबत खासदारांना बोलू देण्यात आले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबाबत बोलत असताना खासदार अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्याचे पाप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी दिल्लीला त्रास व्हायला लागला आहे. भाजपच्या सभापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना थांबवले ही गंभीर व निषेध करणारी बाब आहे," याकडे जयंत पाटलांनी लक्ष वेधले.

"सध्या लोकभावनेचा उद्रेक झालेला आहे. लोकं सरकारच्या विरोधात गेली आहेत. सीमा प्रश्नावरुन राज्यातील काही गावातील लोकं कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यात जातो बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्रात कधीच झाला नाही. एकनाथ शिंदेचे सरकार महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यातही अपयशी ठरले आहे. त्या भागातील जनतेला या सरकारबद्दल अविश्वास वाटायला लागला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या मोर्चाला फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे," असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: "When Sharad Pawar said 'savat tanda', there was a mildness in the language of Karnataka"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.