कोई जब तुम्हारा हृदय तोड दे... !

By admin | Published: January 31, 2017 02:21 AM2017-01-31T02:21:08+5:302017-01-31T02:21:08+5:30

सदाशिव पेठेतल्या निळूभाऊंचा ‘अंग्रेज के जमाने का रेडिओ’ पुरता बिघडला होता. बटण चालू केलं की एकाचवेळी दोन बॅण्ड लागायचे. बातम्या ऐकत असताना मध्येच दुसऱ्या बॅण्डचं

When someone breaks your heart ...! | कोई जब तुम्हारा हृदय तोड दे... !

कोई जब तुम्हारा हृदय तोड दे... !

Next

-  सचिन जवळकोटे

सदाशिव पेठेतल्या निळूभाऊंचा ‘अंग्रेज के जमाने का रेडिओ’ पुरता बिघडला होता. बटण चालू केलं की एकाचवेळी दोन बॅण्ड लागायचे. बातम्या ऐकत असताना मध्येच दुसऱ्या बॅण्डचं गाणं वाजायचं. गाणी लावली तर मध्येच ठळक बातम्या कानावर पडायच्या... तरीही निळूभाऊंनी या ‘टू ईन वन’ डबड्याशी अ‍ॅडजेस्टमेंट करून घेतली होती. आजही त्यांनी बातम्या लावल्या त्याचवेळी त्यांना गाणीही ऐकू येऊ लागली. योगायोग म्हणजे, अगोदरची बातमी नंतरच्या गाण्याशी परफेक्ट मॅच होत गेली.
बातमी : नमस्कारऽऽ आठवडाभरातल्या ठळक बातम्या. मुंबईत आमच्या हक्काच्या जागा मागणारी ही ‘कमळाबाई’ कोण?.. ‘बाण’वाल्यांचा जोरदार सवाल.
गाणं : मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैऽऽ... जो है नामवाला वहीं तो बदनाम है!
बातमी : आता आपण दुसऱ्या बातमीकडं वळू या. ‘बाण’वाल्यांच्या भूमिकेवर संतप्त होऊन ‘आशिष-सोमय्या’ जोडगोळीचा पलटवार. ‘युती नको!’चा जोरदार नारा.
गाणं : तेरी गलियों में नां रखेंगे कदम, आज के बादऽऽ... तेरे मिलने को ना आयेंगे सनम, आज के बादऽऽ.
बातमी : अखेर दोस्ती तुटली. युती फिसकटली. ‘मातोश्री’ अन् ‘वर्षा’ आमने-सामने.
गाणं : दोन हंसो का जोडा बिछड़ गयो रेऽऽ.. गजब हुआ रामाऽऽ गजब हुयो रेऽऽ
बातमी : इतके दिवस हातात हात घालून फिरणारे नेते आता एकमेकांची ‘औकात’ काढू लागले.
गाणं : आ देखे जराऽऽ किस में कितना है दम... बच के रखना कदमऽऽ मेरे साथियाँऽऽ
बातमी : इतक्या वर्षांची युती तुटल्यामुळे म्हणे थोरले बारामतीकर काका दु:खी.
गाणं : जो हमने दास्ताँ अपनी सुनायी... आप क्यों रोये? तबाही तो हमारे दिल पे आयी... आप क्यों रोये?
बातमी : पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे मुखवटे फाडणार. एकाच ठोश्यात समोरच्यांचे दात पाडणार. ‘मातोश्री’वरून घोषणा.
गाणं : आज नां छोडूंगा तुझेऽऽ दम दमा दम... दिल में है तुफान भराऽऽ दम दमा दम.
बातमी : सरकारमधील मित्रपक्ष मात्र ‘कमळाबाई’सोबतच. सदाभाऊंचीही देवेंद्रपंतांनाच साथ.
गाणं : आप की नजरो नें समझा, प्यार के काबिल मुझेऽऽ... दिल की ये धडकन ठहर जा, मिल गयी मंझिल मुझेऽऽ...
बातमी : वेळ पडली तर ‘घड्याळ’ म्हणे ‘कमळाबाई’सोबत राहणार.
गाणं : आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे है हर जुबाँ परऽऽ.. सबको मालूम है और सबको खबर हो गयी...
बातमी : आता शेवटची बातमी. ‘धनुष्य’ सावरण्यासाठी ‘इंजिन’ची धावपळ. ‘मातोश्री’च्या मदतीला म्हणे ‘कृष्णकुंज’ धावणार.
गाणं : कोई जब तुम्हारा हृदय तोड दे... तडपता हुआ जब कोई छोड देऽऽ... तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है, खुलाही रहेगाऽऽ... तुम्हारे लिये!

Web Title: When someone breaks your heart ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.