"बंडखोर ४० आमदार येतील, तेव्हा मनाने मेलेले असतील; त्यांना शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:41 AM2022-06-27T06:41:53+5:302022-06-27T06:42:42+5:30

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत राहूनच मुख्यमंत्री होऊ शकतात. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्याबरोबर आहे. या आकड्यात पैशांना चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ईडीच्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या शिंदे यांना सोडूनही पळ काढतील.

When the rebel 40 MLAs come, they will be dead by heart; we will send them to the morgue for post-mortem says Sanjay raut | "बंडखोर ४० आमदार येतील, तेव्हा मनाने मेलेले असतील; त्यांना शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी"

"बंडखोर ४० आमदार येतील, तेव्हा मनाने मेलेले असतील; त्यांना शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी"

Next

मुंबई : गुवाहाटीत जे ४० लोक आहेत ती जिवंत प्रेते आहेत, मुडदे आहेत. त्यांच्या बॉड्या इकडे येणार आहेत. त्यांचे आत्मे मेलेले असतील. इथे जी आग पेटली आहे, त्यात काय होऊ शकते हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे ते लटपटत आहेत. ते ४० लोक जेव्हा उतरतील तेव्हा ते मनाने जिवंत नसतील, अशा शब्दांत शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर जहरी टीका केली.

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुंबईत ठिकठिकाणी मेळावे आयोजित केले जात आहेत. दहिसर येथील मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली. या ४० आमदारांच्या बॉड्या इथे येतील. त्यांना डायरेक्ट शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी. हे जिथे थांबले त्या गुवाहाटीत कामाख्या देवीचे जागरूक मंदिर आहे. तिथे रेड्याचे बळी देतात. आम्ही ४० रेडे पाठविले आहेत, द्या बळी. 

शिवसेनेच्या विरोधात कट-कारस्थान सुरू आहे. त्यावर लढा देत मात करू. अरे तुम्ही काय शिवसेनेशी लढणार? मेले तुम्ही अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.

चाय तिकडला न्याय
अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आले? दीपक केसरकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करीत शिवसेनेत आले. त्यांनी भाजप व हिंदुत्वाच्या गप्पा माराव्या हे गमतीचे आहे. तानाजी सावंत, सुहास कांदे हे फिरस्ते आहेत. ‘चाय तिकडला न्याय’ हे त्यांचे धोरण. 

ईडीच्या तलवारी
प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, लता सोनवणे या आमदारांवर ईडी व जात पडताळणीसंदर्भात तलवारी लटकल्या होत्या. माझ्या ईडीच्या सर्व केसेस क्लीअर झाल्या. मी सुटलो. त्यामुळे मी भाजप सांगेल ते करतोय, असे सांगून ठाण्याचे एक आमदार सुरतला गेले. यामिनी जाधव, लता सोनवणे पोहोचल्या.

पैशांना चटावलेले बाजारबुणगे
एकनाथ शिंदे हे शिवसेनेत राहूनच मुख्यमंत्री होऊ शकतात. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्याबरोबर आहे. या आकड्यात पैशांना चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ईडीच्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या शिंदे यांना सोडूनही पळ काढतील.

पानटपरीवर पाठवू
गुलाबराव पाटील हे स्वत:स शिवसेनेचा वाघ वगैरे म्हणवून घेतात. पानटपरीवाल्याला कॅबिनेट मंत्री केले. तेच गुलाबराव पाटील पोकळ धमकी देताच ते पळून गेले. त्यांना परत पानटपरीवर पाठवू. 

वॉचमन सत्तेत
संदीपान भुमरे यांना मोरेश्वर सावे यांची उमेदवारी कापून तेव्हा पैठणची उमेदवारी दिली. पैठणच्या एका साखर कारखान्याच्या दारात वॉचमनची नोकरी करणारा हा माणूस शिवसेनेमुळे सत्तेत आहे. वेळ येताच पळून गेला. 

आमच्या पक्षाचा एकच बाप
-     उद्धव ठाकरे यांनी कालच सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरू नका. तुमच्या बापाचे नाव वापरा आणि मते मागा. 
-     बाळासाहेबांचे भक्त पाठीत सुरा खुपसत नाही. जे व्हायचे, ते होऊ द्या. मुंबईत तर यावेच लागेल ना. शिवसैनिक रस्त्यावर आहेत, फक्त आमच्या इशाऱ्याची वाट बघत आहेत.
-     आमच्या पक्षाचा एकच बाप आहे. तुमचे 
तर शंभर बाप आहेत. कुणी मुंबईत आहे. कुणी दिल्लीत आहे. कुणी नागपूरमध्ये आहे. तुम्ही दहा वेळा बाप बदलत आहात. कधी बडोद्याला जाता. कधी सुरतला जाता. कधी गुवाहाटीला जाता. कधी दिल्लीला जाता. बाप बदलणे आमच्या पक्षात चालत नाही, असेही राऊत म्हणाले.

तेव्हा भाजपचा जाच होता
दादा भुसेंपासून अनेक आमदार जे फक्त शिवसेनेमुळे आमदार व मंत्री झाले, ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा भाजपचा जाच होता,  आज महाविकास आघाडीत आहेत तेव्हा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्रास होतोय.

-      शिवसेनेसमोरील हे संकट दूर होईल. हे संकट नाही तर संधी आहे. ताकदीने पुढे जाण्यासाठीचा धडा आहे. 
-     यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाच्या पालख्या व्हायच्या ते आता कळाले आहे, असेही ते म्हणाले.
 

Web Title: When the rebel 40 MLAs come, they will be dead by heart; we will send them to the morgue for post-mortem says Sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.