आम्हाला शिवसेना मिळाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे ५० कोटी मागितले, मी दिले; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 04:08 PM2024-02-17T16:08:11+5:302024-02-17T17:31:26+5:30

Eknath Shinde Speech: बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होते आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते तेथे आता रडण्याचा आवाज येतोय अशी बोचरी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

When we got Shiv Sena, Uddhav Thackeray asked for 50 crores in letter; Big secret explosion of Eknath Shinde | आम्हाला शिवसेना मिळाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे ५० कोटी मागितले, मी दिले; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

आम्हाला शिवसेना मिळाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे ५० कोटी मागितले, मी दिले; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

कोल्हापुरमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गट शिंदे गटावर ५० खोके घेतल्याचा आरोप करत आहे, परंतू उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे शिवसेना आल्यावर पन्नास कोटी रुपये मागितले होते, असा दावा शिंदे यांनी केला आहे. 

उद्धव ठाकरेंवर आलेली खूप संकटे मी झेलली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत, ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेन असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. तसेच आमच्यावर फक्त आरोपच करण्यात येत आहेत. आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आम्हाला तुमची संपत्ती नकोय, बाळासाहेब हीच आमची संपत्ती आहे, असे शिंदे म्हणाले. 

तसेच ५० कोटींच्या मागणीच्या पत्रावरही शिंदे यांनी खुलासा केला आहे. आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह जेव्हा मिळाले तेव्हा शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी रुपये मिळायला हवेतस असे पत्र ठाकरेंनी आम्हाला पाठविले होते. यांना बाळासाहेबांचा विचार नको, पैसे हवे होते. मी त्यांना ५० कोटी रुपये देऊन टाकले. हे पैसे मागताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज पाहिजे होती, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला आहे. 

बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होते आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते तेथे आता रडण्याचा आवाज येतोय अशी बोचरी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. शिवसेना अशीच मोठी झाली नाहीय. रक्ताचे पाणी केले लोकांनी, घरावर तुळशीपत्र ठेवले. आयत्या पिठावर रांगोळीही नीट मारता आली नाही. मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं काम तुम्ही केले, असला कोणता पक्ष प्रमुख असतो जो नेत्यांचा पानउतारा करतो, असा सवाल शिंदे यांनी केला. कदमांचा मनोहर पंत करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे यांनी असे काय मागितलेले की त्यांचा तुम्हाला त्रास होत होता, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे. 
 

Web Title: When we got Shiv Sena, Uddhav Thackeray asked for 50 crores in letter; Big secret explosion of Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.