मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई कधी होणार - उद्धव ठाकरे

By admin | Published: November 16, 2016 08:44 AM2016-11-16T08:44:55+5:302016-11-16T08:44:55+5:30

मशिदीवरील भोंग्यांची डोकेदुखी केवळ हिंदुस्थानातच नाही तर जगातील अनेक देश या व्याधीमुळे बेजार आहेत.

When will the action be taken against mosquitoes? Uddhav Thackeray | मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई कधी होणार - उद्धव ठाकरे

मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई कधी होणार - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १६ - इस्त्रायल सरकारने मशिदींवरील भोंगे हटवण्याचा खमका निर्णय घेतला तसा निर्णय आपल्याकडचे सरकार कधी घेणार असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. मशिदीवरील भोंग्यांची डोकेदुखी केवळ हिंदुस्थानातच नाही तर जगातील अनेक देश या व्याधीमुळे बेजार आहेत. 
 
मात्र महत्त्वाचा फरक असा की, इतर ‘भोंगेपीडित’ देश या दुखण्यावर अक्सिर इलाज शोधून काढत आहेत आणि हिंदुस्थानात मात्र मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत सरकार पातळीवर ठोस उपाययोजना कधीच होत नाही असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 
 
मशिदींतून दिली जाणारी कर्णकर्कश बांग झोपमोड करणारी असते, अशा हजारो तक्रारी इस्त्रायल सरकारकडे आल्या होत्या. आपल्याकडे हिंदुस्थानातही अशा विनंत्या, अर्ज पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे दाखल होत असतात. मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध लाखो तक्रारी गेल्या अनेक वर्षांत सरकारदफतरी दाखल झाल्या आणि धूळ खात पडल्या आहेत. त्यावर निर्णय कधी होणार असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर हिंदुस्थानात कारवाई होत नाही. या पार्श्‍वभूमीवर इस्रायल सरकारने मशिदींवरील भोंगे हटवण्याचा जो खमका निर्णय घेतला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. 
 
- मशिदीवरील भोंग्यांची डोकेदुखी केवळ हिंदुस्थानातच नाही तर जगातील अनेक देश या व्याधीमुळे बेजार आहेत. मात्र महत्त्वाचा फरक असा की, इतर ‘भोंगेपीडित’ देश या दुखण्यावर अक्सिर इलाज शोधून काढत आहेत आणि हिंदुस्थानात मात्र मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत सरकार पातळीवर ठोस उपाययोजना कधीच होत नाही. हे सगळे सांगण्याचे कारण असे की, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन इत्यादी देशांनी मशिदींवर कठोर निर्बंध लादल्यानंतर आता इस्रायलनेही धडाकेबाज निर्णय घेऊन मशिदींवरील भोंग्यांवर बंदी आणली आहे. इस्रायलमधील जेरुसलेम, तेलअवीव आदी ठिकाणी असणार्‍या मशिदींतून दिली जाणारी कर्णकर्कश बांग झोपमोड करणारी असते, अशा हजारो तक्रारी तेथील सरकारकडे आल्या होत्या. 
 
- ज्यू, ख्रिश्‍चनधर्मीयांबरोबरच काही मुस्लिम नागरिकांनीदेखील मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध आवाज उठवला होता. आपल्याकडे हिंदुस्थानातही अशा विनंत्या, अर्ज पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे दाखल होत असतात. मशिदींवरील भोंग्यांविरुद्ध लाखो तक्रारी गेल्या अनेक वर्षांत सरकारदफतरी दाखल झाल्या आणि धूळ खात पडल्या. इस्रायलने मात्र तसे केले नाही. तक्रारींची संख्या वाढल्यानंतर रविवारी या विषयावर इस्रायलच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मशिदीतून रात्री, पहाटे दिली जाणारी बांग आणि त्यामुळे होणारा त्रास यावर या बैठकीत विस्ताराने चर्चा झाली आणि मशिदींवरील भोंग्यांवर निर्बंध लादणार्‍या विधेयकाला इस्रायलच्या मंत्रिमंडळाने तडकाफडकी मंजुरी दिली. या निर्णयामुळे इस्रायलच्या मशिदींवरील भोंगे आता उतरवले जाणार आहेत. 
 
- इस्रायलचा पूर्वेतिहास बघता या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी होणार हे उघड आहे. शिवाय या निर्णयामुळे ‘आमच्या भावना दुखावल्या हो ऽऽऽ’ किंवा ‘इस्लाम खतरे में’, अशी बांग ठोकून आपल्याकडे जसे मुस्लिम रस्त्यावर उतरतात तसे काही इस्रायलमध्ये घडण्याची सुतराम शक्यता नाही. इस्रायल सरकारचा धाकच तसा आहे. वास्तविक इस्रायल हा तसा टीचभर देश. शिवाय चारही बाजूंनी या देशाला इस्लामी देशांनी वेढले आहे. मात्र ज्या ज्या शेजारी देशाने खोडी काढली त्या त्या देशाला इस्रायलने अशी काही अद्दल घडवली की आता एकही अरब देश इस्रायलच्या नादी लागत नाही. पॅलेस्टिनी दहशतवादाचाही इस्रायलने असाच बीमोड केला. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता धडाकेबाज निर्णय घेणे ही इस्रायलची खासियत आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्याचा ताजा निर्णयही त्याच पठडीतील आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी या निर्णयानंतर जे सांगितले ते महत्त्वाचे. मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या निर्णयामुळे धर्मस्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोहचत नाही, असे नेत्यान्याहू यांनी इस्रायलमधील मुस्लिमांना ठणकावून सांगितले.
 
- राज्यकर्त्यांकडे अशी धमक असायलाच हवी. हिंदुस्थानच्या बाबतीत बोलायचे तर शिवसेनेसह सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी वारंवार मागणी करूनही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई होत नाही. कोलकाता उच्च न्यायालयाने तर २० वर्षांपूर्वी धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून टाकण्याचे आदेशच दिले होते. त्याचीही अद्याप अंमलबजावणी नाही. अलीकडे मुंबई उच्च न्यायालयानेही मशिदीवरील बेकायदा भोंगे हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र याचिकेनुसार केवळ नवी मुंबई परिसरातच त्याची अंमलबजावणी झाली. उर्वरित हिंदुस्थानात मात्र मशिदीवरील भोंग्यांवरून कर्णकर्कश बांग दिलीच जात आहे. पहाटे पाच ते रात्री आठ या कालावधीत दिवसातून चार-पाच वेळा अशी बांग दिली जाते. त्याशिवाय मदरशांतून मुस्लिम मुलांना अरबी भाषा शिकवली जाते. त्यासाठी ‘अरबी तालीम का वक्त हो चुका है, अपने अपने बच्चों को मस्जिद में रवाना कर दो’ असे आवाहनही मशिदीच्या भोंग्यावरूनच केले जाते. एखादी मुस्लिम व्यक्ती मरण पावली तर त्याची घोषणाही मशिदींच्याच भोंग्यावरून केली जाते. खास करून रात्रपाळीहून येणारे कामगार, रुग्ण, वयस्कर मंडळी आणि विद्यार्थ्यांचा तर या भोंग्यांमुळे अधिकच छळ होतो. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर हिंदुस्थानात कारवाई होत नाही. या पार्श्‍वभूमीवर इस्रायल सरकारने मशिदींवरील भोंगे हटवण्याचा जो खमका निर्णय घेतला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. 

Web Title: When will the action be taken against mosquitoes? Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.