झोपलेल्या सरकारला जाग केव्हा येणार?- हायकोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 01:56 AM2016-10-27T01:56:19+5:302016-10-27T01:56:19+5:30
कुपोषणाप्रकरणी ढिम्म असलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा असंवेदनशील ठरवले. झोपी गेलेल्या सरकारला जाग केव्हा येणार? असा संतप्त सवाल
मुंबई : कुपोषणाप्रकरणी ढिम्म असलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा असंवेदनशील ठरवले. झोपी गेलेल्या सरकारला जाग केव्हा येणार? असा संतप्त सवाल करत उच्च न्यायालयाने सरकारच्या कोडगेपणापुढे हात टेकले.
कुपोषण दूर करण्यासाठी आत्तापर्यंत काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारला दिले होते. मात्र राज्य सरकारने हा अहवाल सादर न केल्याने उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले. गेले कित्येक वर्ष या याचिका प्रलंबित असून आम्ही वारंवार तेच तेच आदेश देत आहोत. मात्र त्यावर काहीच अंमलबजावणी करण्यात येत नाही. आता आम्ही तरी काय करावे? असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारपुढे हात टेकले.वास्तविकता या समस्येच्या मुळाशी जाउन दूर करायला हवी, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांना या विषयात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)