Maharashtra election 2019 : 'मुख्यमंत्री खोटारडा, महाराष्ट्र खड्डेमुक्त कधी करणार', फडणवीसांना 'राज'चा सवाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 08:48 PM2019-10-15T20:48:51+5:302019-10-15T21:20:05+5:30
Maharashtra election 2019 : पहिल्या वर्षात आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या, असं ते सांगतात. खोटं का बोलायचं? खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची डोंबिवली येथे जाहीर सभा झाली. त्यामध्ये बोलताना मी आज भाषण करायला न येता, फक्त गप्पा मारायला आलो आहे, असे म्हटले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी विकासांसदर्भात काही भाष्य केलं. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. त्यापूर्वी, पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभार वांझोटा असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री चांगला माणूस, उच्चशिक्षित माणसू पण खोटं का बोलतात.
पहिल्या वर्षात आम्ही सव्वा लाख विहिरी बांधल्या, असं ते सांगतात. खोटं का बोलायचं? खड्डेमुक्त महाराष्ट्र करता येत नाही, असे म्हणत राज यांनी महाराष्ट्रातील अपघातांची मालिकाच आपल्या भाषणात वाचून दाखवली. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातून निष्पापांना जीव गमावला लागला, हे राज यांनी सांगतिलं. राष्ट्रीय कॅरेमपट्टूचा नुकताच अपघातात मृत्यू झाला. ठाण्यातील एक तरुणी स्वत:च्या लग्नाची खरेदी करायला जाताना, खड्ड्यातून गाडी गेल्यानं तिचा अपघात झाला. त्यामध्ये दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. राज्यात 14 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, पण आम्हाला काय?. आजपर्यंत राज्य करणाऱ्या राजकारणांना याबबात विचारायचं नाही क? असे राज यांनी म्हटले. तसेच, येथील आमदार रविंद्र चव्हाण यांना मंत्री केलं, तुम्ही प्रश्न का विचारत नाहीत, असा प्रश्नच राज यांनी उपस्थितांना विचारला.
दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? राज्यात एवढा पूर आला की कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, असं म्हणत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला होता. पुण्यातील कसबा येथे सोमवारी रात्री त्यांची सभा पार पडली होती.