पारोळफाट्यावरील अपघातांची मालिका संपणार कधी ?

By admin | Published: May 21, 2016 04:14 AM2016-05-21T04:14:52+5:302016-05-21T04:14:52+5:30

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असुन हया ठिकाणी महामार्ग ओलांडताना गोपाळ कडु (७०) यांचा वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला

When will the series of accidental deaths end? | पारोळफाट्यावरील अपघातांची मालिका संपणार कधी ?

पारोळफाट्यावरील अपघातांची मालिका संपणार कधी ?

Next


विरार : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असुन हया ठिकाणी महामार्ग ओलांडताना गोपाळ कडु (७०) यांचा वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. या ठिकाणी महामार्ग ओलाडण्यासाठी भुयारी मार्ग नागरीकांनी अनेक वेळा मागणी करूनही तो तयार होत नसल्याने आजवर हया गावातील १५ नागरिकांचा बळी गेला असून काहीना कायमचे अपंगत्व आले आहे.
हा भुयारी मार्ग मंजुर झाला असुन अजुन ही हया कामाचा श्रीगणेशा का नाही? तसेच प्रशासनाला अजुन किती बळी घ्यायचे आहेत? कोपर व कशीद हे गाव महार्मालगत असल्याने ये-जा करण्यासाठी महामार्गाचा वापर हा गावातील नागरीकांना करावा लागते. मार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग नसल्यामुळे धोका वाढला आहे. त्यामुळे हया भुयारी मार्गाचे कामसुरू करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
>आम्ही भुयारी मार्ग करण्याबाबत, अनेक वेळा निवेदन दिली, हा भुयारी मार्ग मंजुर होऊनही त्याचें काम का सुरू होत नाही असा प्रश्न गावाचे नागरी सदानंद किणी यांनी लोकमतकडे मांडला.
>महामार्गावरील पेल्हार, शिरसाड हया उड्डाणपुलांचे काम पुर्ण झाले असुन कोपर फाटयावर मंजुर झालेल्या भुयारी मार्गाचे काम पावसाळा संपताच सुरू केले जाईल, २०१७ मार्च पर्यंत हया भुयारी मार्गाचे काम पुर्ण करू असे आय आर बी अधिकारी साठे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: When will the series of accidental deaths end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.