पाणी केव्हा सोडणार?
By admin | Published: July 6, 2016 01:59 AM2016-07-06T01:59:00+5:302016-07-06T01:59:00+5:30
मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने येथील नागरिकांवर घरगुती वापरासाठी पाणी मिळण्याचीही नामुश्की ओढावली आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये
मुंबई : मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाल्याने येथील नागरिकांवर घरगुती वापरासाठी पाणी मिळण्याचीही नामुश्की ओढावली आहे. त्यामुळे जायकवाडीमध्ये नाशिक-नगरच्या धरणांतून पाणी केव्हा सोडणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे करत एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले. मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणांहून दुष्काळग्रस्त भागांत पाणी देण्याबाबत राज्य सरकार का विचार करत नाही? सरकारने याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
राज्य सरकार मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून दुष्काळी भागात पाणी देण्याचा विचार का करत नाही, असा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांकडे उपस्थित केला. ‘लास वेगासमध्ये अत्यंत कमी पाऊस पडतो. त्यामुळे त्यांनी अनेक धरणे बांधली आहेत. पाण्याचा साठा कमी झाल्यास अन्य भागांतून लास वेगासच्या धरणांत पाणी सोडण्यात येते. तेथे धरणे जोडलेली आहेत. असा विचार राज्य सरकार का करू शकत नाही? याबाबत सारासार विचार करावा आणि निर्णय घ्यावा,’ असे म्हणत खंडपीठाने पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)