युती तोडताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला ? - उद्धव ठाकरे

By admin | Published: October 6, 2014 09:11 AM2014-10-06T09:11:08+5:302014-10-06T09:11:08+5:30

जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे.

Where did Balasaheb's respect for breaking the alliance? - Uddhav Thackeray | युती तोडताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला ? - उद्धव ठाकरे

युती तोडताना बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठे गेला ? - उद्धव ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठे गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असेही ठाकरेंनी म्हटले आहे. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असून त्यांना श्रद्धांजली म्हणून शिवसेनेवर टीका करणार नाही अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तासगावमधील सभेत मांडली होती. मोदींच्या या विधानाचा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. युती तुटल्यावर श्रद्धांजली दिल्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात  'बूंद से गयी...' हा विचार येऊ शकतो असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राला लुटले हे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रात आहे. गुजरातच्य मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईत येऊन मुंबईतील उद्योगपतींनी मुंबईत थांबू नये, गुजरातमध्ये चला असे आवाहन करतात. ही देखील महाराष्ट्राची लूट असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्र तोडण्यासाठी भाजप निवडणुकीत उतरले असून शेठ - सावकारांच्या सट्टाबाजारातील पैसा या निवडणुकीसाठी वापरला जात आहे असा आरोपही  ठाकरेंनी केला. 
 
शेळपटांना शिवरायांचे आशीर्वाद कसे मिळणार ? 
कर्नाटकमधील सीमाभागात मराठी जनतेवर अत्याचाराच्या टाचेखाली चिरडले जात असून शिवछत्रपतींचा आशीर्वादवाले महाराष्ट्रात येऊन त्यावर काहीच बोलत नाही असे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले आहे. केंद्रात भाजपची सरकार असून कानडी अत्याचाराविरोधात लोकसभेत राज्यातील भाजप खासदार गप्प बसून होते. अशा शेळपटांना शिवछत्रपतींचे आशीर्वाद कसा मिळणार असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
 

Web Title: Where did Balasaheb's respect for breaking the alliance? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.