वांगणी पुलाचा निधी गेला कुठे?
By admin | Published: September 15, 2014 04:16 AM2014-09-15T04:16:18+5:302014-09-15T04:16:18+5:30
मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकात पश्चिमेकडून फलाटावर येण्यासाठी पूल बांधण्याच्या दृष्टीने १० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या तरतुदीची अद्याप अमलबजावणी झालेली नाही
डोंबिवली : मध्य रेल्वेवरील वांगणी स्थानकात पश्चिमेकडून फलाटावर येण्यासाठी पूल बांधण्याच्या दृष्टीने १० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या तरतुदीची अद्याप अमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पुलासाठी मंजूर झालेला निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वांगणी स्थानकातून अप-डाऊन मार्गे धावणाऱ्या गाड्यांसाठी दोन तर सायडिंगसाठी दोन मार्ग आहेत. येथे पूर्वेकडून फलाटावर येण्यास एक जुना पादचारी पूल आहे. परंतु, पश्चिमेकडून फलाटावर येण्यास पूल नाही. रेल्वेने १० वर्षांपूर्वी येथे सहा लायनींचा एक यार्ड आणि मोटरमन व गार्ड यांना थांबण्यासाठी एक मोठे विश्रामगृहही बांधले आहे. तसेच पूर्व व पश्चिम बाजूस जाण्या-येण्यास पादचारी पुलासही मंजुरी दिली होती. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला होता. परंतु, सहा लायनींचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले असताना पादचारी पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पुलासाठीचा निधी कुठे गेला याचीही काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे यामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप पश्चिम रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी अॅड. दत्तात्रेय गोडबोले यांनी केला आहे.