मृत्युकांड घडविणारी दारू आली कोठून?

By admin | Published: February 26, 2017 12:35 AM2017-02-26T00:35:49+5:302017-02-26T00:35:49+5:30

पांगरमल दारूकांडाची व्यापकता वाढली असून, पोलिसांनी अद्यापपर्यंत ११ आरोेपींना अटक केली आहे़ या प्रकरणाचा तपास आता थेट मिथेनॉलयुक्त दारू बनविणाऱ्यांपर्यंत

Where did the dead man come? | मृत्युकांड घडविणारी दारू आली कोठून?

मृत्युकांड घडविणारी दारू आली कोठून?

Next

अहमदनगर : पांगरमल दारूकांडाची व्यापकता वाढली असून, पोलिसांनी अद्यापपर्यंत ११ आरोेपींना अटक केली आहे़ या प्रकरणाचा तपास आता थेट मिथेनॉलयुक्त दारू बनविणाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे़ यातील मुख्य आरोपी याकूब शेख फरार असून, त्याला पकडल्यानंतर पोलीस ‘मिथेनॉल’पर्यंत पोहचणार आहेत़ याकूब मात्र नगरमधून बिऱ्हाड गुंडाळून पसार झाला आहे़
पांगरमल (ता़ नगर) येथे राजकीय नेत्यांनी १२ फेब्रुवारी रोजी दिलेल्या पार्टीत देशी दारूच्या बाटल्यांमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्यानेच विषबाधा होऊन नऊ जणांचा बळी गेल्याचे नाशिकच्या प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालातून समोर आले आहे़ पोलिसांसमोर आता हा विषारी दारूअड्डा शोधण्याचे आव्हान आहे़ जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमधून पुरवलेल्या दारूमुळे पांगरमल येथील ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे़ परंतु बनावट दारू इतर ठिकाणीही तयार होत होती़ पांगरमल येथे देण्यात आलेली दारू दोन अड्ड्यांवरील होती़ दुसऱ्या अड्ड्यातून जिल्हा रुग्णालयात आणलेल्या देशी बाटल्यांच्या दारूत मिथेनॉलचे घटक आढळून आले आहेत़ दरम्यान शनिवारी शिरपूर येथील दादा वाणी याच्यासह न्यायालयाने मोहन दुग्गल, सोनू दुग्गल व भरत जोशी यांना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़ (प्रतिनिधी)

असे झाले दारूचे हस्तांतरण
जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनचालक मोहन दुग्गल, जाकीर शेख, हमीद शेख यांच्याकडे भीमराज आव्हाड याने पांगरमल येथील पार्टीसाठी विदेशीसह देशी दारूची मागणी केली होती़ दुग्गल व शेख यांनी आव्हाडला त्यांच्याकडील बनावट विदेशी दारूचे बॉक्स दिले तर देशी दारू ही शहरातील दुसऱ्या अड्ड्यावरून याकूब शेख यांच्याकडून मागविण्यात आली़ आव्हाड याने विदेशी दारूचे चार, तर देशी दारूचे १० बॉक्स याच कॅन्टीनमधून खरेदी केले होते़ याच देशी दारूमध्ये मिथेनॉल आढळून आले आहे़

सहा जण निलंबित
कारवाईत हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी या विभागत येथे कार्यरत असलेले उपाधीक्षक एस़ पी़ शिंदे, दुय्यम निरीक्षक बी़आऱ पगारे, बी़टी़ व्यवहारे यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़

Web Title: Where did the dead man come?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.