कुठे गेले ‘अच्छे दिन ?’
By admin | Published: October 12, 2014 03:21 AM2014-10-12T03:21:34+5:302014-10-12T03:21:34+5:30
निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन आणि जनतेला दिवास्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपाने सत्ता मिळताच आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे.
Next
>सोनिया गांधींचा सवाल : शंभर दिवसांतच मोदी सरकार नापास
गोंदिया/ब्रrापुरी : निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन आणि जनतेला दिवास्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपाने सत्ता मिळताच आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. 1क्क् दिवसांत एकाही आश्वासनाची पूर्तता करता आलेली नाही. आता कुठे गेले ‘अच्छे दिन’, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोंदिया येथील जाहीर सभेत केला.
गोंदिया आणि ब्रrापुरी (जि. चंद्रपूर) येथे झालेल्या भरगच्च प्रचार सभेत त्यांनी ‘परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीला मी नमन करते,’ अशी भाषणाची सुरुवात करताच उपस्थिांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
सोनिया गांधी यांनी आपल्या 12 मिनिटांच्या भाषणात भाजपा आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, की मोठमोठी आश्वासने देणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची लक्तरे अवघ्या 1क्क् दिवसांतच वेशीवर टांगली गेली आहेत. ‘अच्छे दिन’ ही घोषणा फुसका बार ठरली आहे. केवळ घोषणांनी आणि पोकळ आश्वासनांनी देश चालत नसून, त्यासाठी त्याग आणि समर्पणाची भावना असावी लागते. ही भावना स्वातंत्र्यपूर्व काळापासून केवळ काँग्रेस पक्षातच असल्याचे त्या म्हणाल्या.
सत्तेवर आल्यावर 1क्क् दिवसांत महागाई कमी करून दाखवू म्हणणा:या मोदी सरकारने महागाई केली का, काळा पैसा बाहेर काढला की, बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली, असे सवाल करीत सत्ता मिळविणो हाच भाजपाचा एकसूत्री कार्यक्रम असल्याचा घणाघात गांधी यांनी केला. या सभेला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह विविध मतदारसंघांचे उमेदवार उपस्थित होते.
अमेरिका भेटीचे फलित काय ?
पंतप्रधान मोदींनी मोठा गवगवा करीत अमेरिका दौरा केला. या दौ:यात त्यांनी काय मिळवले आणि काय कमावले, हे त्यांनाच ठाऊक. मात्र त्यांच्या या दौ:यात त्यांनी विदेशी जीवनरक्षक औषधांच्या किमती कितीतरी पटींनी वाढविल्या; ज्याची किंमत आता सर्वाना चुकवावी लागेल, असा इशारा या वेळी सोनिया गांधी यांनी दिला.
संपुआच्या कामांचे
नरेंद्र मोदींकडून री-ब्रँडिंग
कॉँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने औद्योगिक व विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रत महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे केले. अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या. या योजनांवर स्वत:चा शिक्का मारून नरेंद्र मोदी सरकार री-ब्रँडिंग करीत असल्याची टीका काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी केली.
नवीन सरकारचा चांगल्या
योजना बंद करण्याचा घाट
काँग्रेसने आदिवासींच्या उत्थानासाठी ट्रायबल बिल आणले. नक्षली भागातील मुलांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांचे जीवन सुधारण्यासाठी काँग्रेस सरकारने प्रय} केले, पण नवीन सरकारने काँग्रेसच्या काळातील चांगल्या योजना बंद करण्याचा घाट रचला आहे. विकासाची ही गती अशीच कायम ठेवण्यास राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा, असे आवाहन सोनिया यांनी केले.
नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच बोलत आणि वागत आहेत, अशी बोचरी टीका माजी केंद्रीय वित्त मंत्री पी. चिदंबरम यांनी केली.