दाभोलकर, पानसरे हत्यांच्या तपासासाठी अधिकारी कुठून आणणार - CBI चा सवाल

By admin | Published: October 28, 2015 03:34 PM2015-10-28T15:34:28+5:302015-10-28T15:34:28+5:30

संपूर्ण पश्चिम भारतासाठी आमच्याकडे अवघे ११ अधिकारी असून कामाचा प्रचंड ताण असल्याचे कारण कूर्म तपासगीतासाठी CBI ने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे

Where did the officer bring Dabholkar, Pansare murder investigation? CBI question | दाभोलकर, पानसरे हत्यांच्या तपासासाठी अधिकारी कुठून आणणार - CBI चा सवाल

दाभोलकर, पानसरे हत्यांच्या तपासासाठी अधिकारी कुठून आणणार - CBI चा सवाल

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - संपूर्ण पश्चिम भारतासाठी आमच्याकडे अवघे ११ अधिकारी असून कामाचा प्रचंड ताण असल्याचे कारण कूर्म तपासगीतासाठी CBI ने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाच तपास अत्यंत कूर्मगतीने होत असल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित केली आहे.
पानसरे हत्याप्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाड तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलीसांनी आधीच सांगितले आहे. तर दाभोलकर यांच्या हत्येतील दोन संशयितांची नावे CBI ने मुंबई उच्च न्यायालयात बंद लिफाफ्यात दिली आहेत.
या दोन्ही हत्याप्रकरणाचे गूढ उलगडले नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, अत्यंत तोकडे मनुष्यबळ असल्याची बाजू CBI ने मांडली आहे.

Web Title: Where did the officer bring Dabholkar, Pansare murder investigation? CBI question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.