महामार्गावरील एक लाख झाडे गेली कुठे ?
By admin | Published: June 27, 2016 06:56 PM2016-06-27T18:56:42+5:302016-06-27T18:56:42+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तब्बल एक लाख झाडे गायब झाली आहेत. या रस्त्याचे काम देण्यात आलेल्या आयडीयल रोड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआरबी) या कंपनीने राज्यशासनाने झालेल्या करारानुसार
Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तब्बल एक लाख झाडे गायब झाली आहेत. या रस्त्याचे काम देण्यात आलेल्या आयडीयल रोड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआरबी) या कंपनीने राज्यशासनाने झालेल्या करारानुसार रस्त्याची बांधणी करताना दुभाजकांमध्ये तब्बल 1 लाख झाडे लावण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, या कराराला हरताळ फासत काही मोजक्याच ठिकाणी झाडे लावण्यात आली असल्याने या महामार्गावरील अपघात रोखण्यात अडथळे येत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. 14 वर्षापूर्वी काम सुरू असतानाच; ही झाडे लावली गेली असती तर अनेक अपघात रोखण्यात तसेच वाहने उलटून विरूध्द दिशेने जाणा-या अपघातांची संख्या रोखता आली असती असा दावा वेलणकर यांनी केली आहे.
या महामार्गावर सुरू असलेली अपघातांची मालिका कायम असून गेल्या काही वर्षात वाहनांच्या तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने या मार्गावर वाहनांच्या वेगाला नियंत्रण आणणे अशक्य बनले आहे. त्यातच या रस्त्यावरील लेन मध्ये दुभाजक मोठा असला तरी त्याची उंची कमी आहे. अनेक ठिकाणी तो रस्त्याशी समतल आहे. अशा स्थिती रात्रीच्या वेळी अनेक वाहनांच्या प्रखर दिव्यांचा प्रकाश विरूध्द दिशेने येणा-या वाहनांवर मोठया प्रमाणात पडतो. त्यामुळे अपघात वाढले आहेत. या शिवाय अनेकदा एखाद्या वेगाने जाणारे वाहन उलटल्यास अथवा टायर फुटल्यास हे अपघातग्रस्त वाहन थेट कोणत्याही अडथळया विना विरूध्द दिशेच्या लेनवर जाऊन पडते. त्यामुळे अपघात होऊन जिवितहानीतर होतेच पण तासंतास वाहतूकीचा खोळंबाही होतो. अशा स्थितीत महामार्गाच्या दुभाजकावर 14 वर्षापूर्वीच झाडे लावली गेली असती ती मोठी झाली असती. मात्र, कंपनीकडून काही मोजक्याच ठिकाणी झाडे लावल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वेलणकर यांनी केली आहे.
काय आहे झाडांचा फायदा ?
या महामार्गावर पनवेल ते देहूरोड हे जेवढे अंतर आहे सर्वसाधारण पणे तेवढचे अंतर गुजरात मधील अहमदाबाद ते बडोदा हे अंतर आहे. मात्र, या महामार्गावर दुभाजकांमध्ये मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. ही झाडे मोठी झाली असल्याने अनेकदा अपघातानंतर गाडया झाडांना धडकतात. त्यामुळे त्या विरूध्द दिशेच्या लेन मध्ये येत नाहीत. या शिवाय झांडामुळे रात्रीच्या वेळी गाडयांच्या दिव्याच्या प्रकाशाचा त्रास विरूध्द दिशेच्या वाहनांना होत नाही. त्यामुळे पर्यायाने अपघातांची संख्याही घटण्यास मदत होते. त्यामुळे या महामार्गावरील अपघातांची संख्या मुंबई- पुणे महामार्गावर होणा-या अपघातां पेक्षा कितीतरी अधिक पटींनी कमी असल्याचे वेलणकर यांनी स्पष्ट केले.
रस्ते बांधणीच्या झालेल्या करारानुसार, कंपनीने 1 लाख झाडे लावणे अपेक्षीत होते. मात्र, ती लावली गेलेली नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी दुभाजक सताड उघडे आहेत. त्यांना कोणताही अडथळा नाही. त्यामुळे वाहनांचा अपघात झाल्यानंतर अनेक वाहने थेट विरूध्द दिशेला जात आहेत. त्यामुळे किमान आता वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन ही झाडे लावली जातील याकडे एमएसआरडीसीने लक्ष देण्याची गरज आहे.- विवेक वेलणकर (अध्यक्ष सजग नागरीक मंच )