राणेंकडे एवढी संपत्ती आली कोठून?-केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 03:07 AM2017-09-25T03:07:07+5:302017-09-25T03:07:19+5:30
प्राप्तिकर विभागात शिपाई असलेली व्यक्ती २० वर्षांत उद्योगपती धीरूभाई अंबानींच्या खालोखाल बंगला कसा काय बांधू शकते? एवढी संपत्ती आली कोठून? असा सवाल गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग): प्राप्तिकर विभागात शिपाई असलेली व्यक्ती २० वर्षांत उद्योगपती धीरूभाई अंबानींच्या खालोखाल बंगला कसा काय बांधू शकते? एवढी संपत्ती आली कोठून? असा सवाल गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पक्षात घेताना भाजपाने विचार करावा. राणेंच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात सिंधुदुर्गनंतर आता महाराष्ट्रात रान उठविणार, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसने मुख्यमंत्रिपद देतो, सांगून फसविले, असे राणे सांगत आहेत. उद्या भाजपानेही आपणास मुख्यमंत्री करतो, असे सांगून फसविले, असे सांगायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. भ्रष्टाचारमुक्त भारत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या गोष्टींचा विसर पडू नये, असेही केसरकर म्हणाले.
सिंधुदुर्गमधील अनेक खुनांचा तपास लागलेला नाही. खुनांची माहिती देणाºया व्यक्तीस बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाºयांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.