जनतेला दिलेली आश्वासनं सत्ता आल्यावर कुठं जातात? - उद्धव ठाकरे

By admin | Published: October 13, 2016 03:20 PM2016-10-13T15:20:09+5:302016-10-13T15:51:26+5:30

सत्ता आल्यावर जनतेला दिलेली आश्वासनं कुठं जातात, असा खोचक सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेतील भाजपला टोला हाणला.

Where do the promises given to the people come to power? - Uddhav Thackeray | जनतेला दिलेली आश्वासनं सत्ता आल्यावर कुठं जातात? - उद्धव ठाकरे

जनतेला दिलेली आश्वासनं सत्ता आल्यावर कुठं जातात? - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 13 - सत्ता आल्यावर जनतेला दिलेली आश्वासनं कुठं जातात, असा खोचक सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेतील भाजपला टोला हाणला.
तसेच, माझे आमदार आधी काम करतात, मग बोलतात. महाराष्ट्रातील जनतेची नाळ ओळखू शकला तरचं सत्ता करु शकाल, सल्लाही त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना यावेळी दिला. जळगावातील पाचोरा येथील एका आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
या सभेच्यावेळी मंचावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितिन लढ्ढा, माजी आमदार सुरेशदादा जैन, दादा भुसे, चंद्रकांत पाटील, संतोष चौधरी उपस्थित होते. 
 
 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे - 
- माझे आमदार आधी काम करतात, मग बोलतात.
- या ठिकाणी आलेली सर्व मंडळी विश्वासाच्या नात्यामुळे आली आहेत.
- दिलेली आश्वासनं सत्ता आल्यावर कुठं जातात,  उद्धव ठाकरे यांचा सवाल
- मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे एक दिवसाचं अधिवेशन बोलवा.
- राजकरण करुन घरं पेटविण्यापेक्षा चूल पेटवा.  
- जनतेची नाळ ओळखू शकला तरचं सत्ता करु शकता.
- मराठा समाज स्वताचा हक्क, न्याय मागतोय.
- मराठा आरक्षण कधी देताय ते आधी सांगा.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि शरद पवार यांच्या भेटीत चर्चा काय झाली माहित नाही.
- जिथे शिवसेनेवर अन्याय होईल तिथे सरकारला पाठिंवा देणार नाही.
- पाकिस्तान गेले किती दिवस आपल्यावर हल्ले करतोय.
- पाकिस्तानही हिंदुस्थान म्हणून ओळखला जाईल अशी धडक कारवाई करा.
- शिवसेनेच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून ईबीसी जाहीर.
- आता कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तात्काळ अभिनंदन केलं, राजकारण करत बसलो असतो तर माझ्यासारखा नतद्रष्ट कोणी नसता.
- सर्जिकल स्ट्राइकचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यावर राजकरण सुरु आहे. 
- सर्व जनतेसाठी सर्जिकल स्ट्राइक्स.
- एवढ्यावरं थांबायचं नाही, तर असे अनेक सर्जिकल स्ट्राइक्स केले पाहिजे.

Web Title: Where do the promises given to the people come to power? - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.