कुठे झालाय हागणदारीमुक्त महाराष्ट्र : रेल्वेमार्गावर शौच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 08:17 PM2019-08-30T20:17:58+5:302019-08-30T20:18:57+5:30

पुणे, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, घोरपडी, हडपसर परिसरातील रेल्वे  मार्गावर जवळच्या वस्तीतील लोक शौचाला बसतात...

Where is hagandari mukta Maharashtra ? | कुठे झालाय हागणदारीमुक्त महाराष्ट्र : रेल्वेमार्गावर शौच

कुठे झालाय हागणदारीमुक्त महाराष्ट्र : रेल्वेमार्गावर शौच

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वेमार्गावर शौच : प्रशासन म्हणतेय, प्रभावी अंमलबजावणी करा

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षी महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली. पण रेल्वे प्रशासन मात्र रेल्वेमार्गावर शौचास बसणाऱ्यांमुळे हैराण झाले आहे. हागणदारी मुक्तीच्या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी व उपाययोजना करण्याची खुप आवश्यकता असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. तसेच हे रोखण्यासाठी रेल्वेकडून गुडमार्निंग पथक नेमले असून संबंधितांची धरपकड सुरू केली आहे. उघड्यावर शौचास बसणाऱ्या १२५ जणांवर दंडात्मक कारवाईही केली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, घोरपडी, हडपसर परिसरातील रेल्वे  मार्गावर जवळच्या वस्तीतील लोक शौचाला बसतात. महापालिकेने सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी तेथील लोक रेल्वेमार्गावर येतात. कदाचित पालिकेने दिलेली सुविधा अपुरी असु शकते. मात्र, या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकातून जाणाºया गाड्यांमधील प्रवाशांमध्ये पुणे शहराविषयी वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे. तसेच रेल्वेमागार्ची देखभाल-दुरूस्ती करताना रेल्वे कर्मचाºयांना खुप वाईट स्थिती काम करावे लागते. लोकांचा सततचा वावर असल्याने मार्गावरील खडी अस्ताव्यस्त होते. त्याचा परिणाम रेल्वेमार्गाच्या समतोलावर होत आहे. सिग्नल यंत्रणेतही अडचणी येत आहेत. नट-बोल्ट गंज लागल्याने त्याची दुरूस्ती करण्यात समस्या निर्माण  होत आहेत.
या अडचणींमुळे रेल्वे प्रशासनाने थेट राज्य शासनाच्या हागणदारी मुक्तच्या घोषणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज्य हागणदारीमुक्त असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी व उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिकेच्या सुविधांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. 
.........
रेल्वेचे गुडमॉर्निंग पथक
रेल्वेमार्गावर शौचास बसणाºयांना प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तीन स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी काही दिवसांपुर्वी सकाळी ६ वाजता संगम ब्रीज ते शिवाजीनगर स्थानकापर्यंत पायी जात पाहणी केली होती. यादरम्यान जवळच्या वस्त्यांमधील लोकच शौचाला येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथके नेमून कारवाई सुरू केली. ही पथके सकाळी ६ ते ९ यावेळेत संगम ब्रीज ते शिवाजीनगर स्थानक, पिंपरी चिंचवड ते आकुर्डी दरम्यान ही पथके गस्त घालत घालून रेल्वेमार्गावर शौचास येणाºयांची धरपकड करत आहेत. याअंतर्गत दि. १७ आॅगस्टपासून १२५ जणांना पकडून त्यांच्याकडून ४२ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

Web Title: Where is hagandari mukta Maharashtra ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.