आनंदी मंत्रालयाच्या नावे आनंदी आनंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:50 AM2019-01-15T05:50:19+5:302019-01-15T05:50:31+5:30

नुसतीच घोषणा; ना मंत्री, ना कार्यालय

where is happy ministry of state government | आनंदी मंत्रालयाच्या नावे आनंदी आनंदच !

आनंदी मंत्रालयाच्या नावे आनंदी आनंदच !

Next

मुंबई : लोकांच्या तनामनात आनंद पेरण्यासाठी आनंदी मंत्रालयाची स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व मदत, पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण तीन वर्षे झाली तरी हे खाते निर्माण होऊ शकलेले नाही. आनंदी मंत्रालयाच्या नावे सध्या तरी आनंदी आनंदच आहे.


‘हॅपिनेस इंडेक्स’वर समाजाची श्रीमंती मोजणारा भुतान हा जगातील एकमेव देश आहे. त्याच धर्तीवर भाजपाने मध्य प्रदेशात आनंदी मंत्रालयाची स्थापना केली. आपल्याकडे असे आनंदी मंत्रालय स्थापण्याचा मनोदय व्यक्त झाला. मदत व पुनर्वसन विभागांद्वारे हे खाते चालेल असे पाटील यांनी जाहीर केले होते. ‘आनंदीश मंत्रालयाचा कारभार पाटील यांच्याकडे’ अशा बातम्याही त्यावेळी आलेल्या होत्या.
या मंत्रालयाची संकल्पना ज्या आयएएस अधिकाऱ्यांनी लावून धरली. त्यांना इतर विभागाच्या अधिकाºयांनी सहकार्य केले नाही, हेही सर्वज्ञात आहे. या विभागाचे यश सर्व विभागांच्या सहकार्यावर अवलंबून आहे आणि सर्वांचे काम हे कोणाचेच काम नसते असा अनुभवही या निमित्ताने आला. आनंदी मंत्रालयाद्वारे समाजाच्या चेहºयावर हसू फुलविण्याच्या प्रयत्नांचे घोडे नमनालाच अडले.

नुसतीच घोषणा; ना मंत्री, ना कार्यालय
मदत व पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी मध्य प्रदेशात जाऊन अभ्यास केला. काही एनजीओंची मदत घेण्यात आली. त्या आधारे राज्यातील आनंदी मंत्रालयाची संकल्पना तयार केली आणि ती सादरदेखील केली.
च्लोक दु:खी का आहेत व त्यांना आनंदी करण्यास काय करता येऊ शकेल याची ब्ल्यू प्रिंट त्यात होती. लोकांचे दु:ख कशात आहे हे जाणून घेण्यास एक सर्वेक्षण करण्याची शिफारस त्यात होती. पण, असे सर्वेक्षण झालेच नाही.

Web Title: where is happy ministry of state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.