कुठे गेले अच्छे दिन ?
By admin | Published: October 5, 2014 01:01 AM2014-10-05T01:01:50+5:302014-10-05T01:01:50+5:30
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिवास्वप्न दाखविले, परंतु अवघ्या चार महिन्यातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कुठे गेले अच्छे दिन,असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज
पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल : काँग्रेसला एक हाती सत्ता द्या
नागपूर : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिवास्वप्न दाखविले, परंतु अवघ्या चार महिन्यातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कुठे गेले अच्छे दिन,असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेत्यांना केला. शनिवारी पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त पारडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी खासदार गेव्ह आवारी, विलास मुत्तेमवार, बाबुराव वंजारी, तानाजी वनवे,युवक काँग्रेसचे बंटी शेळके नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
शंभर दिवसात विदेशी बँकातील काळा आणण्याची गर्जना भाजप नेत्यांनी केली होती. परंतु कुठे गेला हा पैसा. गुजरातच्या मार्गावर केंद्राची वाटचाल सुरू आहे. परंतु गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. म्हणूनच आम्ही दिलेले जाहीर चर्चेचे आवाहन स्वीकारण्याचे धाडस मोदी यांच्यात नाही. असे असले तरी मराठवाडा, विदर्भाचा विकास झाला तरच महाराष्ट्र पुढे जाईल. काँग्रेसला एक हाती सत्ता द्या, विकास काय असतो ते आम्ही दाखवू, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
नागपूर मेट्रोचे कामाला आम्ही सुरुवात केली. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नरेंद्र मोदींना आणून फित कापली. प्रकल्प आम्ही उभारले फित कापण्याचे काम भाजप नेते करीत आहेत. राज्यातील पालघर येथील प्रस्तावित सागरी सुरक्षा प्रबोधनी गुजरातला नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. परंतु महाराष्ट्रातील भाजप नेते गप्प होते.
महाराष्ट्रात भाजपचा नेता क ोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच ते मोदींच्या सभांची वाट बघत आहेत. काँग्रेस सरकारने मेट्रोसाठी प्रयत्न केला, शेतकऱ्यासाठी १२-१३ हजार कोटींच्या योजना आणल्या. राजीव गांधी जीवनदायी योजना, मोफत औषध सुविधा, रोजगार निर्मिती, सांडपाणी व्यवस्थापन , झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र असे लोकोपयोगी उपक्र म राबवावयाचे आहेत. तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी , राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँगे्रसला एक हाती सत्ता द्या, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
सिंंचनावरील श्वेतपत्रिका व राज्य बँकेवर प्रशासन नेमल्याने मित्र पक्ष नाराज झाला. पारदर्शी व स्वच्छ कारभार देण्याचा प्रयत्न केला. परंतु यात आडकाठी आणण्याचे प्रयत्न झाल्याची टीका चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली.
गेल्या पाच वर्षात पूर्व नागपुरातील विकास ठप्प झाला. त्यामुळे नागरिकांत निराशेचे वातावरण आहे. परंतु जनतेने सेवेची संधी दिल्यास पाच वर्षात मतदारसंघाचा कायापालट करू, अशी ग्वाही अभिजित वंजारी यांनी दिली.सभेला मोठी गर्दी होती.(प्रतिनिधी)
दूध का दूध, पानी का पानी
भाजपने २५ वर्षापूर्वीची युती तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही १५ वर्षापूर्वीची आघाडी तोडली. कुणालाही बहुमत मिळाले नाही तर निवडणुकीनंतर घोडेबाजार होईल. १९९५ सालात राज्यातील जनतेने युतीचा खंडणी वसुलीचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ द्या, असे आव्हान चव्हाण यांनी विरोधकांना दिले.