सिंचनाचे 70 हजार कोटी कुठे गेले?
By Admin | Published: September 14, 2014 01:46 AM2014-09-14T01:46:25+5:302014-09-14T01:46:25+5:30
राज्यात केवळ एक दशांश सिंचन वाढले, मग सिंचन प्रकल्पांचे सत्तर हजार कोटी रुपये गेले कोठे,
गडकरींचा सवाल
कवठेमहांकाळ (जि़ सांगली) : राज्यात केवळ एक दशांश सिंचन वाढले, मग सिंचन प्रकल्पांचे सत्तर हजार कोटी रुपये गेले कोठे, सिंचन योजना पूर्ण का झाल्या नाहीत, असा सवाल केंद्रीय परिवहन व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी राज्यातील आघाडी सरकारला केला.
कवठेमहांकाळ येथे आयोजित भाजपा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित घोरपडे यांनी गडकरींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला़ ते पुढे म्हणाले, आज देशात साखरेला किंमत नाही. पेट्रोल-डिङोलचे भाव वाढत आहेत. देशातील शेतकरी इथेनॉल तयार करू शकतो, मग आधीच्या काँग्रेस सरकारने पेट्रोल-डिङोलवर इतके पैसे कशाला उधळले? ते शेतक:यांना का दिले नाहीत? शेतक:याचा ट्रॅक्टर त्यानेच तयार केलेल्या इथेनॉलवर चालला पाहिजे. अठराशे कोटीचे उड्डाणपूल एक हजार कोटीत उभे करून आठशे कोटी वाचवले. आमच्यानंतर पंधरा वर्षात राज्यात केवळ एक दशांश टक्के सिंचन वाढले, मग सिंचन प्रकल्पांचे सत्तर हजार कोटी रुपये गेले कोठे? भ्रष्टाचार कोणी केला? सिंचन योजना पूर्ण का झाल्या नाहीत? मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी त्याचे उत्तर द्यावे. (प्रतिनिधी)