निवडणूक काळात पकडलेली रक्कम जाते कुठे?
By admin | Published: October 5, 2014 12:18 AM2014-10-05T00:18:03+5:302014-10-05T00:18:03+5:30
निवडणूक म्हटले की, मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते.
Next
>मंगेश पांडे - पिंपरी
निवडणूक म्हटले की, मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते मिळविण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते. या तपासणीत अनेकदा मोठी रोकडही आढळते. मात्र, सापडलेल्या रकमेचे काय होते, रक्कम कुठे जाते याबाबत नागरिकांनाच प्रश्न पडतो.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून पोलिसांना दिले आहेत. पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिका:यांच्या पथकाकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. संशयित वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. उमेदवारांचे निवासस्थान व संपर्क कार्यालय परिसरात निवडणूक विभागाचे अधिक लक्ष आहे. या परिसरात जाणा:या-येणा:या वाहनांवर करडी नजर ठेवली जात आहे. संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. ओळखपत्र पाहू, तुमच्या परिसरात राहणा:या प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव सांगा या प्रश्नांना वाहनचालकाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांची उत्तरे देताना अडखळल्यास अधिकच सखोल चौकशी केली जात आहे. वाहन तपासणीत अनेकदा मोठी रक्कम पकडली जाते. या रकमेचा तपशील संबंधित व्यक्तीने पोलिसांना सादर करावा लागतो. सीआरपीसी कलम 41 (ड) या अंतर्गत बेहिशेबी अथवा संशयास्पद रक्कम जप्त करण्याची तरतूद आहे. मोठी रक्कम बाळगणारा व्यक्ती आढळल्यास त्याच्याकडे चौकशी केली जाते. दरम्यान, त्या व्यक्तीने समाधानकारक उत्तरे न दिल्यास अथवा त्याच्याकडे रकमेच्या व्यवहाराची कागदपत्रे उपलब्ध नसल्यास रक्कम जप्त केली जाते. रकमेचा प्राप्तिकर भरलेला आहे का, याची पडताळणी केली जाते. त्यानंतर न्यायालयात कागदपत्रे सादर करून रक्कम परत मिळते. तर ती रक्कम निवडणुकीशी संबंधित असल्याची माहिती समोर आल्यास निवडणूक विभागामार्फत कारवाई केली जाते.
कारवाईचा देखावा
4चौकशी करण्याचा अनेकदा देखावा केला जातो. कारवाई केल्याचे कागदोपत्री दाखविण्यासाठी एखाद्या ठिकाणी नाकाबंदी करायची, पाच-दहा वाहने अडवून चौकशी करायची, असे प्रकार अनेकदा घडतात.
कारवाईची तरतूद
4निवडणूक काळात पैसे वाटप करताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीस पोलीस ताब्यात घेतात. त्याच्याकडे सखोल चौकशी केली जाते. संबंधित व्यक्ती उमेदवाराशी संबंधित आहे का, निवडणुकीशी काही संबंध आहे. त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कलम 171 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला जातो.
4चिखलीतील पूर्णानगर येथे शनिवारी 22 लाखांची रोकड पकडण्यात आली. ही रक्कम बाळगणा:याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर ही रक्कम प्राप्तिकर विभागाकडे देण्यात आली. तसेच सोमवारी रात्री उर्से टोल नाक्यावर 58 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
4निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वाहनांची तपासणी होत असल्याने रीतसर व्यवहार करणा:या व्यक्तींनाही रक्कम बाळगणो कठीण झाले आहे. पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे.
4निवडणूक काळात 5क् हजारांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगू नये असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिकची रक्कम जवळ असल्यास त्याचा खुलासा द्यावा.