आमी कुठं बसावं! कसं शिकावं !

By admin | Published: July 21, 2016 08:06 PM2016-07-21T20:06:53+5:302016-07-21T20:06:53+5:30

अगोदरच अंगणवाडीची दूरवस्था झालेली त्यात पावसाचे पाणी शिरलं अंगणवाडीसमोर तलावाचं स्वरुप आलं आमी अंगणवाडीत जावं तर जाता येईना़ आता कुठं बसावं कसं शिकावं ही व्यथा आहे

Where should we live? How to learn! | आमी कुठं बसावं! कसं शिकावं !

आमी कुठं बसावं! कसं शिकावं !

Next

आप्पासाहेब पाटील 
सोलापूर : अगोदरच अंगणवाडीची दूरवस्था झालेली त्यात पावसाचे पाणी शिरलं अंगणवाडीसमोर तलावाचं स्वरुप आलं आमी अंगणवाडीत जावं तर जाता येईना़ आता कुठं बसावं कसं शिकावं ही व्यथा आहे कारंबा (ता़ उत्तर सोलापूर) येथील चिमुकल्यांची़
अंगणवाडी ही ग्रामीण भागातील बालकांसाठी सुरू झालेली योजना आहे़ मुले हीच राष्ट्राचे भविष्य असतात. त्यामुळे बालकांची जडणघडण आणि विकास हेच आपले कर्तव्य मानून बालकांच्या सर्वागीण विकास व सेवासुविधा मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असताना कारंबा (ता़ उ़ सोलापूर) येथील अंगणवाडी शाळेकडे सर्व शासकीय यंत्रणेने आजपर्यंतच्या सर्वच कामात जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे़

बुधवारी सायंकाळपासून कारंबा परिसरात पावसाला जोरदार सुरूवात झाली़ गुरूवारी पहाटे तीन वाजेपर्यंत पाऊसाची रिपरिप सुरूच होती़ यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठया प्रमाणात पाणी साचले होते़ हेच दुर्गंधीयुक्त पाणी अंगणवाडीत शिरले़ त्यामुळे अंगणवाडीतील मुले आज शाळेसमोर साचलेल्या पाण्यातच बसून शिकली़ शेवटी सप्तरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल सुतार व नबीलाल शेख यांनी त्या मुलांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर जागा करून दिली़ त्यामुळे अंगणवाडीतील मुलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच धडे घेतले़.

Web Title: Where should we live? How to learn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.