शिंदेंच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली की नाही, पण वाढदिवसाचे बॅनर थेट अमेरिकेत झळकले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:52 PM2023-02-08T22:52:15+5:302023-02-08T22:52:31+5:30

युवासेना कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगेंच्या माध्यमातून बॅनरबाजी करण्यात आली. 

Whether or not 33 countries took notice of Shinde's rebellion, the birthday banner was directly reflected in America | शिंदेंच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली की नाही, पण वाढदिवसाचे बॅनर थेट अमेरिकेत झळकले

शिंदेंच्या बंडाची ३३ देशांनी दखल घेतली की नाही, पण वाढदिवसाचे बॅनर थेट अमेरिकेत झळकले

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेत शिवसेनेचे मविआसोबतचे सरकार पाडले होते. या बंडाची दखल ३३ देशांनी घेतल्याचे शिंदेंनी सांगितले होते. यावरून खरेच असे झालेले का यावरून चर्चा झडली असताना अमेरिकेत मात्र एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले आहेत. 

भारतीय वंशाच्या परंतू न्यू यॉर्कमध्ये राहणाऱ्या तरुणांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकविले आहेत. या तरुणांनी शिंदेंचा वाढदिवस साजरा केला. युवासेना कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगेंच्या माध्यमातून बॅनरबाजी करण्यात आली. 

शिंदेंच्या वाढदिवसाचे बॅनर तयार करून ते टाईम्स स्क्वेअर आणि ग्रँण्ड सेंट्रल येथे झळकवण्यात आले. 

Web Title: Whether or not 33 countries took notice of Shinde's rebellion, the birthday banner was directly reflected in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.