कोणत्या मंत्र्याला मिळणार कोणतं खातं?
By admin | Published: July 7, 2016 11:42 PM2016-07-07T23:42:17+5:302016-07-07T23:42:17+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार होत आहे. उद्या ८ जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून सकाळी ९ वाजता शपथविधी पार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार होत आहे. उद्या ८ जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून सकाळी ९ वाजता शपथविधी पार पडणार आहे. या मंत्रिमंडळामध्ये सुत्रांच्या माहितीनुसार काही मंत्र्यांना मिळणारी खाती खालीलप्रमाणे असल्याची समजतात.
- चंद्रकांत पाटील : सार्वजनिक बांधकाम, महसूल खातं.
- अर्जुन खोतकर: गृहराजमंत्री.
- सुभाष देशमुख: कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी.
- गृहराज्यमंत्री राम शिंदेच प्रमोशन: कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार (कृषी खातं).
- गिरीश महाजन: उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा (विनोद तावडेंकडून वैद्यकीय शिक्षण खातं जाण्याची शक्यता).
- मदन येरावर: वस्त्रोद्योग खातं.
- तर, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील खात्यात कोणताही बदल नाही.