रहस्य! तिरडी बांधली, अंत्ययात्रा निघाली अन् अचानक मृतदेह उठून बसला; गावकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:11 AM2022-10-27T11:11:22+5:302022-10-27T11:12:23+5:30

पोलिसांनी या तरुणासह त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण इतकं गूढ आहे त्यामुळे सत्य बाहेर काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

While being taken for the funeral, the ‘dead young man’ got up from the turban in Akola | रहस्य! तिरडी बांधली, अंत्ययात्रा निघाली अन् अचानक मृतदेह उठून बसला; गावकरी हैराण

रहस्य! तिरडी बांधली, अंत्ययात्रा निघाली अन् अचानक मृतदेह उठून बसला; गावकरी हैराण

googlenewsNext

अकोला - एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. पाणावलेल्या डोळ्यांनी मृत व्यक्तीला अखेरचा निरोप दिला जातो. या कठीण प्रसंगात प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात. या भावनिक क्षणी कुटुंबाला धीर देणं गरजेचे आहे. परंतु अकोला जिल्ह्यातील एका घटनेने सर्व गावकरी हादरले आहेत. अंत्यसंस्कारावेळी जे काही घडले ते पाहून सगळेच थक्क झाले. 

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात २५ वर्षीय प्रशांत मेसरे या तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी विवरा गावात पसरली. मेसरे कुटुंबामध्ये रडारड सुरू झाली. गावकरी अंत्यसंस्काराची तयारी करत होते. तिरडी बांधली, अंत्ययात्रा सुरू झाली पण अचानक स्मशानभूमीत घेऊन जाताना हा तरूण उठून बसल्याने अनेकांना धक्का बसला. तो फक्त उठला नाही तर त्याने गावकऱ्यांशी गप्पा मारल्या. या तरुणाला गावच्या मंदिरात ठेवले असून तो बोलत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. 

गावात घडलेल्या या घटनेची चर्चा जिल्ह्यात पसरली, या तरुणाला पाहण्यासाठी सर्वांनीच गर्दी केली. या प्रकाराची माहिती पोलिसांना कळताच पोलिसही गावात पोहचले. काही लोक याला दैवी चमत्कार असल्याचं सांगत आहेत. प्रशांत हा होमगार्डमध्ये असून त्याच्या अंगात येत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. प्रशांत मेसरे हा काही दिवसांपासून आजारी होता. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल केले होते. बुधवारी प्रशांतची तब्येत खालावली. त्यानंतर अचानक डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केले. 

दरम्यान, पोलिसांनी या तरुणासह त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण इतकं गूढ आहे त्यामुळे सत्य बाहेर काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. चिखलीहून गावात प्रशांतला आणण्यात आले. तेव्हा गावातील कुणालाही त्याच्या घरी येऊन दिले नाही. जेव्हा अंत्ययात्रा निघाली तेव्हा मृतदेहाच्या शरीराच्या हालचाली काहींच्या निदर्शनास आल्या. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्या डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केले त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे ही घटना ऐकून कुतूहल वाटत असलं तरी यामागच्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधून काढावी लागणार आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: While being taken for the funeral, the ‘dead young man’ got up from the turban in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.