होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:19 IST2025-03-14T16:18:53+5:302025-03-14T16:19:18+5:30
"राज ठाकरे यांच्यासंदर्भात काय बोलायचे? मी म्हणेन, तुम्ही एक करा, 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टंन-टनानट, टोल के उपर गिनो भाई, टोल के उपर गिनो, लोकीन, लेकीन, राज समज लेना, इर राज के अंदर, कभी भी भाषा के उपर रोटी न सेकना," असे सदावर्ते म्हणाले...

होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले
आज संपूर्ण राज्यात होळी हा सण उत्साहात साजरा होत आहे. या रंगोत्सवानिमित्र सर्वच क्षेत्रांतील लोक एकमेकांना शुभेच्छा देताना दिसतात. दरम्यान, यानिमित्ताने वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधू, शरद पवार आदींना धुलीवंदनाच्या शुभेच्छा देत खोचक सल्ला दिला आहे. याशिवाय सदावर्ते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
सदावर्ते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गाण्याच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा देत खोचक सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले, "गमसे बाहर निकलो और होली के दीन गले पडो (संजय राऊत यांच्या), और बोलो एक दुसरे को, भाई अबतो होली में छोडदो, मामू... मामू लोगों का प्यार... होली है भाई होली है, बुरा न मानो होली है..."
यानंतर शरद पवारांना शुभेच्छा देताना सदावर्ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, यांच्या नावाने आधी बोंब मारायला हवी. ज्या पद्धतीने संजय राऊतांचे एक चॅनल आहे. तसेच तुमचेही एक चॅनल आहे. तुमचे एन्टरटेनमेंट असेच सुरू राहो आणि महाराष्ट्राची प्रगती होत राहो." तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना सदावर्ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांना खूप-खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या राज्यातील मुख्यमंत्री म्हणून कामाला. त्यांच्या हातून कष्टकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप भले होवो, अशामी त्यांना शुभेच्छा देतो." सदावर्ते टीवी९ मराठीसोबत बोलत होते.
राज ठाकरे यांनाही डिवचलं -
यावेळी, गुणरत्न सदावर्ते यांनी 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टनटनाटन' म्हणत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही डिवचल्याचे. राज ठाकरे यांच्यासंदर्भात विचारले असता, सदावर्ते म्हणाले, "राज ठाकरे यांच्यासंदर्भात काय बोलायचे? मी म्हणेन, तुम्ही एक करा, 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टंन-टनानट, टोल के उपर गिनो भाई, टोल के उपर गिनो, लोकीन, लेकीन, राज समज लेना, इर राज के अंदर, कभी भी भाषा के उपर रोटी न सेकना." यानंतर पुन्हा सदावर्ते आणि त्यांची पत्नी, "टोल के उपर जीना भाई, टोल के उपर जीना," असे म्हणतानाही दिसले.