कर्जाच्या खर्चावर श्वेतपत्रिका
By admin | Published: December 2, 2014 04:15 AM2014-12-02T04:15:58+5:302014-12-02T04:15:58+5:30
राज्यावर ३ लाख ४४४ हजार कोटी रुपये कर्ज आहे. मात्र, कर्ज काढून उभारलेला एवढा पैसा नेमका कुठे खर्च झाला यावर प्रकाश टाकण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका काढली
नागपूर : राज्यावर ३ लाख ४४४ हजार कोटी रुपये कर्ज आहे. मात्र, कर्ज काढून उभारलेला एवढा पैसा नेमका कुठे खर्च झाला यावर प्रकाश टाकण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी घोषणा वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे केली.
वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी ‘लोकमत भवन’ला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात खर्च केलेल्या कर्जाच्या रकमेतून राज्याची किती संपत्ती तयार झाली, महसुलात किती वाढ झाली, रोजगारनिर्मिती किती झाली व लोकसमूहाला याचा किती फायदा झाला या चार निकषांवर अभ्यास करून ही श्वेतपत्रिका काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसला वारशामध्ये सत्ता मिळाली व आम्हाला कर्ज मिळाले आहे. काँग्रेस सरकारने कर्जापासून राज्याची कुठलीही संपत्ती उभारलेली नाही. पैसा खर्च झाला पण गतीने विकास झाला नाही. मध्य प्रदेशचा कृषी विकास दर २४ टक्क्यांवर गेला, आपण यात बरेच मागे राहिलो. येत्या काळात हे चित्र बदलायचे आहे. त्यासाठी ऊर्जा, उद्योग, कृषी, सिंचन, वन आदी विभागांत कसे चांगले काम करता येईल यासाठी प्रत्येक विभागाला स्वतंत्रपणे सादरीकरण करण्याचे निर्देश दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)