पांढऱ्या कांद्यानंतर आता मिळणार पांढरे वांगे !

By Admin | Published: January 1, 2015 02:12 AM2015-01-01T02:12:53+5:302015-01-01T02:12:53+5:30

औषधी गुणधर्म असलेल्या या वांग्याचे बियाणे लवकरच शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे.

White wings after the white onion! | पांढऱ्या कांद्यानंतर आता मिळणार पांढरे वांगे !

पांढऱ्या कांद्यानंतर आता मिळणार पांढरे वांगे !

googlenewsNext

राजरत्न सिरसाट - अकोला
पांढऱ्या कांद्याच्या वाणानंतर पांढरे संकरित वांग्याचे वाण निर्माण करण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भर दिला असून, औषधी गुणधर्म असलेल्या या वांग्याचे बियाणे लवकरच शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही वांगी गुणकारी राहतील, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
वांग्यामध्ये जीएम पद्धतीचा वापर करण्यावर मध्यंतरी पर्यावरण संघटनांनी विरोध केल्याने जीएम वांगे उत्पादनाचा प्रयोग मागे पडला आहे. कृषी विद्यापीठाने मात्र वांगे या पालेभाजीवर संशोधन करू न एकेएल बी-२ हे नवे वाण विकसित केले आहे. या वाणाला गतवर्षीच्या राज्यस्तरीय संयुक्त संशोधन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे या वांग्याचे वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी वितरित करण्यात आले आहे.
वांग्याची प्रचंड मागणी बघता विद्यापीठाने पांढरे शुभ्र वांगे निर्माण करण्यासाठी संशोधन हाती घेतले होते़ जंगली आणि उपलब्ध वांग्याच्या वाणावर संकर करून नवे संकरित वाण तयार करण्याच्या प्रयत्नांना यश आले असून, प्राथमिक स्वरू पात काही वांगे निर्माण करण्यात आले़ परंतु त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे.
लांब, गोल, अंड्यांच्या आकारापासून ते भरिताच्या वांग्याच्या आकारापर्यंत पांढरे वांगे निर्मितीचे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे हे पांढरे वांगे मधुमेहावर प्रभावी उपचार करणारे असल्याचे या वांग्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे.

पांढरे वांगे लवकरच
उपलब्ध करू न दिले जाणार
पांढऱ्या वांग्यावर प्राथमिक संशोधन पूर्ण झाले असून, औषधी गुणधर्म असलेले विविध आकाराचे पांढरे वांगे लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करू न दिले जाणार आहेत.
- डॉ.पी.के. नागरे, विभागप्रमुख,
उद्यान विद्याशास्त्र, डॉ.पंदेकृवि, अकोला.

Web Title: White wings after the white onion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.