मेजर इक्बाल अन् समीर अली कोण आहेत, शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केला? तेहव्वूर राणा मोठा खुलासा करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:43 IST2025-04-13T15:41:49+5:302025-04-13T15:43:21+5:30
एनआयएने १० एप्रिल रोजी अमेरिकेतून भारतात तेहव्वूर राणा याला आणले. राणाची नव्याने चौकशी करत आहेत.

मेजर इक्बाल अन् समीर अली कोण आहेत, शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केला? तेहव्वूर राणा मोठा खुलासा करणार
२६/११ हल्ल्यातील पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची कथित भूमिका दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाले आहे. आता त्याची चौकशी सुरू आहे.
एनआयए १० एप्रिल रोजी अमेरिकेतून भारतात आणलेल्या तहव्वूर राणाची नव्याने चौकशी करत आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणाची चौकशी करण्याचे मुख्य लक्ष दोन नावांवर आहे. पहिले नाव मेजर इक्बाल आणि दुसरे नाव मेजर समीर अली आहे. या दोघांचाही एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश आहे.
तहव्वूर राणा आता भारतीय तपास संस्थांच्या देखरेखीखाली आहे. एनआयए आता राणा याच्यासह दोन आयएसआय अधिकाऱ्यांनी २६/११ हल्ल्याचा कट रचला होता का? याची माहिती घेत आहे.
मेजर इक्बाल कोण आहे?
मेजर इक्बाल हा सामान्य नाही. २०१० च्या शिकागो आरोपपत्रात त्याचे वर्णन सक्रिय आयएसआय अधिकारी म्हणून करण्यात आले होते. त्याच्यावर डेव्हिड कोलमन हेडलीला निधी पुरवल्याचा, त्याला प्रशिक्षण दिल्याचा आणि मुंबईत रेकी करण्याची संपूर्ण योजना राबवल्याचा आरोप आहे.
डोविड हेडली हा अमेरिकन-पाकिस्तानी डबल एजंट होता. २०१० मध्ये त्याला शिक्षा झाल्यानंतर त्याने स्वतः कबूल केले की मेजर इक्बाल हा त्याचा मुख्य आयएसआय हँडलर होता. २०११ च्या साक्षीत हेडलीने म्हटले होते की, त्याने 'चौधरी खान' हे त्याचे सांकेतिक नाव आहे. सोबत २० हून अधिक ईमेलची देवाणघेवाण केली होती. एका ईमेलमध्ये राजाराम रेगे नावाच्या शिवसेनेच्या नेत्याचा 'कव्हर' म्हणून वापर केल्याचा उल्लेखही होता.
२०१६ च्या पीटीआयच्या वृत्तानुसार, राजाराम रेगे म्हणाले होते की, "हेडली मला शिवसेना भवनाबाहेर भेटला, पण मी त्याला आत येऊ दिले नाही." दुसऱ्या एका ईमेलमध्ये, मेजर इक्बालने हेडलीला 'प्रकल्पां'बद्दल माहिती आणि पाळत ठेवण्याच्या उपकरणांवरील अहवाल मागितला.
अमेरिकेच्या आरोपपत्रात मेजर इक्बाल हा पाकिस्तानचा रहिवासी असल्याचे म्हटले आहे. त्याचा लष्कराच्या हल्ल्यांच्या नियोजनात सहभाग होता. दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचाही आरोप होता. कागदपत्रांमध्ये आयएसआयचा स्पष्ट उल्लेख नाही.