ईडीच्या रडारवरील ते माजी मुख्यमंत्री कोण?

By Admin | Published: November 6, 2016 03:30 AM2016-11-06T03:30:51+5:302016-11-06T03:30:51+5:30

सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांची, तसेच अनिवासी भारतीय बिल्डरची ३०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याची

Who is the former Chief Minister of the radar? | ईडीच्या रडारवरील ते माजी मुख्यमंत्री कोण?

ईडीच्या रडारवरील ते माजी मुख्यमंत्री कोण?

googlenewsNext

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांची, तसेच अनिवासी भारतीय बिल्डरची ३०० कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. हे माजी मुख्यमंत्री कोण याची सर्वाना उत्सुकता असून, शनिवारी दिवसभर राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू होती.
हा बिल्डर सध्या दक्षिण मुंबईत एक गगनचुंबी निवासी इमारतींचे संकुल उभारत आहे. सदर माजी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी ३०० कोटी रुपयांची रक्कम सायप्रस, मॉरिशस या देशांमधील काही कंपन्यांमध्ये शेअर्सच्या स्वरूपात वळविली आणि तिथून ती मुंबईतील या इमारतीच्या उभारणीसाठी गुंतवली, असे सांगण्यात येते. हे करताना १० रुपयांच्या शेअरची किंमत एक हजार रुपये दाखविण्यात आली.
सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणात चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, अधिक माहिती देण्यास नकार दिला. या प्रकरणात ईडीच्या रडारवर असलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी लवकरच बोलाविले जाण्याची शक्यता आहे. आवश्यक त्या कागदपत्रांची छाननी करून संबंधितांना ईडीकडून चौकशीसाठी बोलाविले जाऊ शकते. त्यानंतर, गुन्हे दाखल करण्यात येतील. काही कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. या माजी मुख्यमंत्र्यांनी एवढा पैसा कुठून आणला, तो कसा वळविला, याचीही चौकशी सुरू आहे.
१० रुपयांच्या एका शेअरची किंमत हजार रुपयांपर्यंत वाढवायची आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ती पुन्हा मुंबईतील सदर टॉवरच्या उभारणीसाठी वळवायची, असे प्रकार करण्यात आले. या माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे हे व्यवहार करण्यात आले होते का, ही बाबदेखील चौकशीच्या रडारवर आहे. (प्रतिनिधी)

नातेवाईकांच्या नावे...
१० रुपयांच्या एका शेअरची किंमत हजार रुपयांपर्यंत वाढवायची आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ती पुन्हा मुंबईतील सदर टॉवरच्या उभारणीसाठी वळवायची, असे प्रकार करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
याच माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या काही नातेवाईकांच्या नावे हे व्यवहार करण्यात आले होते का, ही बाबदेखील सक्तवसुली संचालनालयाकडून होणार चौकशीच्या रडारवर आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Web Title: Who is the former Chief Minister of the radar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.