पालकमंत्री कोणाचे? युतीचे की आघाडीचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2016 12:14 AM2016-01-09T00:14:03+5:302016-01-09T00:53:51+5:30

अतुल काळसेकर : प्रशासनाला योग्यवेळी झटके देणार

Who is the Guardian Minister? The front of the alliance? | पालकमंत्री कोणाचे? युतीचे की आघाडीचे?

पालकमंत्री कोणाचे? युतीचे की आघाडीचे?

Next

सावंतवाडी : आघाडीच्या सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांची मनमानी आम्ही सहन केली. मात्र, युतीचे सरकार आल्यानंतरही आम्हाला याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पालकमंत्री नेमके युतीचे की आघाडीचे, असा खडा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला. तसेच भाजप पालकमंत्र्यांसह प्रशासनाच्या कामावर पूर्णत: नाराज असून, योग्य वेळी आम्ही झटके देऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे सरचिटणीस श्यामकांत काणेकर, तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, मनोज नाईक, प्रभाकर सावंत, महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
काळसेकर म्हणाले, मार्चमध्ये नियोजनचा आराखडा १२५ कोटीवर गेला आहे. त्याबद्दल पालकमंत्र्याचे आम्ही अभिनंदनही केले. मात्र, आजपर्यंत नियोजनच्या एकाही कामाची सुरूवात झाली नाही. निविदा प्रक्रियाच झाली नाही तर कामे कशी होणार, असा सवाल करीत काळसेकर यांनी अन्य जिल्ह्यात कामांची भुमिपूजने झाल्याची आठवण यावेळी करून देत गेले आठ महिने नियोजनची बैठकही घेण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात प्रशासनावर जेवढी नाराजी आहे, तेवढीच नाराजीही पालकमंत्र्यावर असून, आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे हे देवगड व सावंतवाडी मतदार संघात मनमानी कारभार करीत होते. त्याला रोखठोक उत्तर द्यायचे सोडून पालकमंत्री दीपक केसरकर हे समानतेची तागडी घेऊन बसले असून, त्यात सामान्य कार्यकर्ते दुरावत चालले आहेत, अशी खंत काळसेकर यांनी व्यक्त केली. याबाबत भाजपने वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली असून, प्रशासनाबरोबरच पालकमंत्र्यांना आम्ही झटके देऊ. मात्र, हे झटके कोणत्या स्वरूपाचे असतील ते त्यावेळीच कळतील, असे सांगत पालकमंत्र्यांच्या कामावर काळसेकर यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)


मी दोनवेळा भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुुक नाही, असे सांगत पुन्हा फॉर्म भरणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्पष्ट केले.
- अतुल काळसेकर, भाजपा, जिल्हाध्यक्ष

Web Title: Who is the Guardian Minister? The front of the alliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.