पायाभूत सुविधा कोणी केल्या?

By admin | Published: October 1, 2014 02:23 AM2014-10-01T02:23:09+5:302014-10-01T02:23:09+5:30

भारतामध्ये उद्योगासाठी पूरक वातावरण आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी अमेरिकेतील उद्योजकांना करीत आहेत.

Who has the infrastructure? | पायाभूत सुविधा कोणी केल्या?

पायाभूत सुविधा कोणी केल्या?

Next
>तुळजापूर : भारतामध्ये उद्योगासाठी पूरक वातावरण आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी अमेरिकेतील उद्योजकांना करीत आहेत. पण हे पूरक वातावरण, पायाभूत सुविधा कोणी निर्माण केल्या, कॉंग्रेसनेच ना, असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी केला.
   तुळजापूर येथे मंगळवारी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या विराट सभेला 3क् हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. 11 वाजताची नियोजित सभा दुपारी 1.3क् वाजण्याच्या सुमारास सुरु झाली. तरीही हजारोंचा जनसमुदाय जागेवरुन हललेला नव्हता. नवरात्रोत्सवामुळे तुळजापुरात राज्यभरातून आलेले भाविक आणि त्यातच काँग्रेस कार्यकत्र्याची गर्दी यामुळे सभा संपल्यानंतर तुळजापुरातील वाहतूक व्यवस्था सुमारे तासभर ठप्प झाली होती. 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र कालही क्रमांक एकवर होता आणि भविष्यातही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशात अग्रभागी राहिल. सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असल्याने मतदारांनी संधी म्हणून याकडे पहायला हवे.काँग्रेस सत्तेत आल्यास महाराष्ट्राच्या सर्वागिण विकासाची दरवाजे खुले होतील, असे ते म्हणाले. 
स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य असल्याचे क्षणोक्षणी जाणवत असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील जनता निश्चितपणो काँग्रेसच्या पाठीशी राहिल असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख,  बसवराज पाटील, रजनीताई पाटील, आदींची भाषणो झाली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Who has the infrastructure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.