एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:09 IST2025-03-17T15:05:54+5:302025-03-17T15:09:32+5:30

Maharashtra council election 2025: विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून, एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत रुघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. 

who is Eknath Shinde Shiv Sena Candidate Chandrakant raghuvanshi | एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी? 

एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी? 

MLC Election 2025: विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुतीकडून पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यात भाजपने तीन तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेलं वचन पाळत चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे रघुवंशी कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे, जाणून घ्या...

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदेंनी रघुवंशी यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता. धडगाव येथे झालेल्या सभेत त्यांनी याबद्दल विधान केले होते. अखेर त्यांचं नाव जाहीर करण्यात आले. आमश्या पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाल्यामुळे त्यांच्या जागेवर आता त्याच भागातील नेत्याला शिंदेंकडून संधी दिली गेल्याचे दिसत आहे. 

धुळे नंदुरबार भागात प्रभाव

चंद्रकांत रघुवंशी हे धुळे, नंदूरबार भागात काम करतात. त्या भागात त्यांचा प्रभाव आहे. आगामी काळात या भागात पक्षाची स्थिती आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत रघुवंशींना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. 

कोण आहेत चंद्रकात रघुवंशी?

धुळे, नंदूरबार जिल्ह्यात मोठा लोकाश्रय असलेले चंद्रकांत रघुवंशी दोन वेळा धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. १९९२ ते १९९७ आणि १९९७ ते १९९८ या काळात ते शिवसेनेकडून जिल्हा परिषद अध्यक्ष होते. 

चंद्रकांत रघुवंशी हे नंतर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले आणि विधान परिषद आमदार बनले. १९९८ ते २००३, २००४ ते २०१० आणि २०१४ ते २०१९ असे तीन वेळा ते विधान परिषद आमदार राहिले आहेत. 

चंद्रकांत रघुवंशी हे तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षही राहिले आहेत. पंधरा वर्षांपासून त्यांनी नंदुरबार नगरपालिकेची सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नंदुरबार बरोबरच धडगाव समितीवरही शिवसेनेचा भगवा फडकावला आहे. 

Web Title: who is Eknath Shinde Shiv Sena Candidate Chandrakant raghuvanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.