महाराष्ट्राचा बाहुबली कोण? ठाण्यात पोस्टर लागले... एकनाथ शिंदे झळकले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:49 PM2022-06-28T23:49:53+5:302022-06-28T23:52:17+5:30

Maharashtra Political Crisis: ठाण्यात शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने उभारला शिंदे यांचा बाहुबली स्वरूपातील बॅनर 

Who is the Bahubali of Maharashtra? Posters in Thane of Eknath Shinde's Revolt Shivsena | महाराष्ट्राचा बाहुबली कोण? ठाण्यात पोस्टर लागले... एकनाथ शिंदे झळकले

महाराष्ट्राचा बाहुबली कोण? ठाण्यात पोस्टर लागले... एकनाथ शिंदे झळकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :  एकनाथ शिंदे यांना  समर्थन करण्यासाठी ठाण्यात एकीकडे शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने एकनाथ शिंदे यांना थेट बाहुबली अशी पदवी देत बाहुबलीच्या स्वरूपात त्यांचे मोठे बॅनर उभारले आहे. या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे बाहुबली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.आता हे बॅनर आता सर्वांचे लक्षं वेधून घेत असून एकनाथ शिंदे यांचे बाहुबली स्वरूपात उभारण्यात आलेले हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

     एकनाथ शिंदे यांना ठाणे महापालिकेतील 67 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येत आहे.तर दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.मंगळवारीच शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी टेंभी नाका आणि शक्तीस्थावळर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.यामध्ये शिवसेना महिला आघाडी देखील आघाडीवर होत्या.त्याच्या दुसऱ्या दिवशीच आता शिवसेनेच्या दक्षिण विभागाने थेट बाहुबलीच्या प्रतिमेत एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उभारली असून हे बॅनरच आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

      हा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या निवस्थानाच्या बाहेरच लावण्यात आला आहे.यासंदर्भात अद्याप दक्षिण भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.मात्र या बॅनरच्या माध्यमातून विजयी भवं असा संदेश देखील देण्यात आला आहे.त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दक्षिण भारतीयांचा देखील पाठिंबा यानिमित्ताने जाहीर कारण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे .

Web Title: Who is the Bahubali of Maharashtra? Posters in Thane of Eknath Shinde's Revolt Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.