‘महाराष्ट्राचा प्रभावी राजकारणी कोण?’
By admin | Published: March 21, 2016 03:46 AM2016-03-21T03:46:56+5:302016-03-21T03:52:01+5:30
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१६’ या पुरस्काराच्या निमित्ताने या वर्षी प्रथमच दोन आगळेवेगळे विभाग तयार करण्यात आले आहेत. कोणाकडून आहेत अपेक्षा? आणि प्रभावी राजकारणी कोण?
मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१६’ या पुरस्काराच्या निमित्ताने या वर्षी प्रथमच दोन आगळेवेगळे विभाग तयार
करण्यात आले आहेत. कोणाकडून आहेत अपेक्षा? आणि प्रभावी राजकारणी कोण? अशा या दोन विभागांत दोन मान्यवरांची निवड ही राज्याच्या राजकीय इतिहासात चर्चेचा विषय बनेल; आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रासाठी ती मोठी उपलब्धी असेल.
अनेक नेते राजकीय पटलावर येतात. त्यातील अनेक आपली प्रभावी छाप पाडतात. असे अनेक नेते आहेत ज्यांना छोट्यातल्या छोट्या गावातला कार्यकर्ता नावानिशी माहिती असतो. त्यामागे त्यांची अनेक वर्षांपासूनची मेहनत असते. राज्याचा उभा-आडवा भूगोल आणि गावोगावचे राजकारण, बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखण्याची ताकद असणारे प्रभावी नेते म्हणूनच प्रत्येकाला भावतात, आवडतात. लोक अनेकदा अशा नेत्यांच्या वागण्या-बोलण्याचे अनुकरणही करू लागतात. काही नेते काम भरपूर करतात, पण प्रभाव लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. असे म्हणतात की, ‘ये पब्लिक है, सब जानती है’ राजकारण्यांना दूषणे देणे, प्रस्थापितांच्या विरोधात बोलत राहणे, त्यासाठी सोशल मीडियाचा बिनदिक्कत वापर करणे ही स्टाईल झाली असली तरी प्रत्येकाला मनातून कुठेना कुठे नेत्यांचा प्रभाव जाणवत असतो. महाराष्ट्राच्या जनमनावर आणि या राज्याच्या विकासावर सर्वांत प्रभावी छाप टाकणारा नेता कोण, हा प्रश्न कायम प्रत्येकाच्या चर्चेत असतो. त्याचेच उत्तर तुमच्या मतांतून आणि ज्यूरीच्या कौलातून महाराष्ट्राला मिळणार आहे.
(सर्व नामांकनांचा क्रम इंग्रजी आद्याक्षरानुसार)
प्रभावी राजकारणी कोण? (नामांकने)
१) अजित पवार - राष्ट्रवादी - प. महाराष्ट्र
२) अशोक चव्हाण - काँग्रेस - मराठवाडा
३) एकनाथ खडसे - भाजपा - खानदेश
४) गुरुदास कामत - काँग्रेस - मुंबई
५) जयंत पाटील - राष्ट्रवादी - प. महाराष्ट्र
६) नितीन गडकरी - भाजपा - विदर्भ
७) पीयूष गोयल - भाजपा - मुंबई
८) पृथ्वीराज चव्हाण - काँग्रेस - पश्चिम महाराष्ट्र
९) राज ठाकरे - मनसे - मुंबई
१०) उद्धव ठाकरे - शिवसेना - मुंबई
>> आॅनलाइन मतदान असे करता येईल!
नामांकने www.lokmat.com येथे जाहीर करण्यात आली आहेत. आपण या साईटवर जा. तेथे ‘व्होट नाऊ’ असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर मतदानासाठी सगळी नामांकने येतील. विविध विभागासाठीच्या नामांकनांची यादी आपल्याला तेथे दिसेल. फोटोंवर क्लिक केल्यास त्या व्यक्तीविषयीची माहिती येईल आणि आपल्याला ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे त्यांच्या नावावर क्लिक केल्यास आपले मत त्या व्यक्तीस मिळेल. एका विभागात एकाच व्यक्तीला मतदान करता येईल. सगळ्यात शेवटी ‘कन्फर्म व्होट’ असे लिहिलेले आहे. त्यावर क्लिक केल्यास आपली मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. आपण कोणत्या विभागासाठी कोणाला मतदान केले आहे त्याची यादी त्यानंतर लगेच आपल्याला दिसेल. तर चला, आॅनलाइनला भेट द्या आणि निवडा आपले विजेते..!