एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास दिल्ली तयार नव्हती; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 06:48 PM2023-07-23T18:48:34+5:302023-07-23T19:34:18+5:30

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले.

Who suggested the name of Eknath Shinde as Chief Minister; Devendra Fadnavis' secret blast in Kupate tithe Gupte | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास दिल्ली तयार नव्हती; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास दिल्ली तयार नव्हती; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

googlenewsNext

खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही खुलासे केले आहेत. गेल्या आठवड्यात फडणवीस यांची मुलाखत असलेला भाग प्रकाशित झाला. आज फडणवीस यांनी या भागावर काही ट्विट केले आहेत. यामध्ये फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणी शिफारस केली, या मागची स्टोरी सांगितली आहे. 

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटल्याची चर्चा महाराष्ट्रात होत होती. तेव्हा खरोखच देवेंद्र फडणवीस शॉक झाले होते. परंतू, शिंदेंनी मुख्यमंत्री केले म्हणून नाही, तर त्यांना प्रदेशाध्यक्ष करायचे सोडून उपमुख्यमंत्री केल्याबद्दल देवेंद्रना आश्चर्य वाटले होते. यामागचा गेम प्लॅन वेगळाच होता. 

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्याचा प्रस्ताव कोणी दिलेला? यावर फडणवीस यांनी मी आणि एकनाथ शिंदे भेटलो तेव्हा हे सरकार आपल्या विचारांना पटणारे नाही, असे एकमत झाले. मी ठरविले होते की मी मुख्यमंत्री होणार नाही. सरकार बदलण्यावर चर्चा झाली, हिंदू आणि हिंदुत्वाचा दम घुटत होता. तेव्हा मी एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलतायत तर त्यांनीच मुख्यमंत्री व्हायला हवे असे मत मांडले. दिल्लीत गेलो, वरिष्ठांना हे सांगितले. त्यांना समजावण्यात खूप वेळ गेला. माझ्या पक्षाने लगेचच माझा प्रस्ताव स्वीकारला नाही, असे फडणवीस म्हणाले. 

एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलणार आहेत, त्यांनाच नेता बनवावे यावर पक्षाचे नेते सहमत होते, परंतू ते लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकतील का? या सवालावर सारे अडले होते. परंतू, काही दिवसांनी दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यावर होकार दिला, असे फडणवीस म्हणाले. 

मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तशी वरिष्ठांशी बोलणीही झाली होती. मी सरकारमध्ये राहणार नाही असे त्यांना सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष बनून मी ती जबाबदारी पार पाडेन असे सांगितलेले. कठोर मेहनत घेऊन पुढील दोन वर्षांत पक्षाला एक नंबरला नेईन, सर्वकाही असे ठरले. पण ऐनवेळी मला उपमुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा मला धक्का बसला असे फडणवीस म्हणाले. 

त्यापुढचा शॉक राज्यपालांना...
राज्यपालांना या मुख्यमंत्री पदाच्या घडामोडींची कल्पनाच नव्हती. जेव्हा शिंदे आणि मी पत्र द्यायला गेलो तेव्हा आम्ही दोघे आणि वरचे तीन नेत्यांनाच हे माहिती होते. राज्यपालांना शिंदे मुख्यमंत्री बनतील असे पत्र दिले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. मी त्यांना हेच ठरले असल्याचे सांगितले. यानंतर मी पीसी घेऊन शिंदेंच्या नावाची घोषणा केली. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर चिंता किंवा दु:ख नव्हते. तर विजयाचा आनंद होता, परंतू तो जास्त वेळ टिकू शकला नाही, असेही फडणवीस म्हणाले. 

Web Title: Who suggested the name of Eknath Shinde as Chief Minister; Devendra Fadnavis' secret blast in Kupate tithe Gupte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.