कचऱ्याच्या प्रश्नावर संवाद करायचा कोणाशी? - सुळे
By Admin | Published: May 5, 2017 03:26 AM2017-05-05T03:26:34+5:302017-05-05T03:26:34+5:30
देशाच्या स्वच्छतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेतला. मात्र त्यांचे पुणे शहरातील प्रतिनिधी पुण्याचा कचरा प्रश्न वाऱ्यावर
पुणे : देशाच्या स्वच्छतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेतला. मात्र त्यांचे पुणे शहरातील प्रतिनिधी पुण्याचा कचरा प्रश्न वाऱ्यावर सोडून परदेशात फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांना तीनवेळा या विषयावर टॅग केले, कपिल शर्माच्या वैयक्तिक प्रश्नासाठी सगळी मुंबई महापालिका कामाला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकदाही संपर्क केला नाही. त्यामुळे आता याविषयी संवाद करायचा कोणाशी, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
एकोणीस दिवसांपासून रखडलेल्या या विषयासंदर्भात खासदार सुळे यांनी गुरुवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली. राष्ट्रवादीने गुरुवारी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महापालिकेत पुन्हा कचरा समस्येवर आंदोलन केले. पुण्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यावरून राजकीय वातावरणही तापले आहे. सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह यात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. (प्रतिनिधी)