कोण होणार देशातला पुढचा आर्यभट्ट ?

By admin | Published: April 26, 2016 02:56 AM2016-04-26T02:56:57+5:302016-04-26T02:56:57+5:30

युनिव्हर्सल कॉन्सेप्ट फॉर मेंटल अरिथमॅटिक सिस्टीमचे मास्टर फ्रँचाइझी (यूसीएमएएस) यांनी सादर केलेली व्हिज्युअल आणि लिसनिंग (दृश्य आणि श्रवण) स्पर्धा २०१६ मुंबईत पार पडली.

Who will be the next Aryabhata? | कोण होणार देशातला पुढचा आर्यभट्ट ?

कोण होणार देशातला पुढचा आर्यभट्ट ?

Next

मुंबई : सीबीएस एज्युकेशन प्रा. लि.च्या मुंबई विभागाचे युनिव्हर्सल कॉन्सेप्ट फॉर मेंटल अरिथमॅटिक सिस्टीमचे मास्टर फ्रँचाइझी (यूसीएमएएस) यांनी सादर केलेली व्हिज्युअल आणि लिसनिंग (दृश्य आणि श्रवण) स्पर्धा २०१६ मुंबईत पार पडली. त्यात प्रेक्षकांनी पाहिले, की ६ ते १३ वयोगटातील मुलांचा मेंदू कसा रोबोटसारखा काम करू शकतो. यात वांद्रेच्या मयंक रानावडे (९ वर्षे) याला ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’ घोषित करण्यात आले.
स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसह इतर जिल्ह्यांतील १,६००हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. लिसनिंग स्पर्धेत स्पर्धकाला प्रश्न ऐकून त्याचे उत्तर कॅल्क्युलेटरहून कमी वेळात, ०.६ सेकंदांत द्यायचे होते. पुढे व्हिज्युअल राउंडमध्ये विद्यार्थ्यांनी बोर्डवर पाहिलेल्या व्हिज्युअलआधारे उत्तरे द्यायची होती आणि प्रश्नाचे सेकंदाच्या आत उत्तर द्यायचे होते. त्यांना कॅल्क्युलेटरपेक्षा जास्त वेगाने विविध मूल्यांच्या डझनभर संख्यांच्या ओळींचा हिशोब करायचा होता. संजय भोईर, सीबीएस एज्युकेशन प्रा. लि.चे संचालक म्हणाले, की अगदी प्रथमच आम्ही महाराष्ट्रात व्हिज्युअल स्पर्धेचे आयोजन केले, ज्यामध्ये मुले आणि पालक दोघांचा सक्रिय सहभाग होता. या उपक्रमामुळे मुलांची श्रवण आणि दृश्य क्षमता वाढण्यास निश्चित मदत होईल. ते म्हणाले, की यूसीएमएएस हे केवळ अबॅकस नाही, ज्याने मेंदूच्या विकासाला मदत होते. तर त्यामुळे तर्कशुद्ध विचार, स्मरणशक्ती, कल्पनाविकास
आणि वाढत्या मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळते, ज्यामुळे भविष्यात त्यांना फायदा होऊ शकतो. मुलांचे मन आणि त्यांच्या बोटांची सुसंगती पाहणे हे खरोखर चकित करणारे होते. (प्रतिनिधी)

Web Title: Who will be the next Aryabhata?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.