कोण असेल अन्य मुख्यमंत्री?
By admin | Published: October 20, 2014 05:34 AM2014-10-20T05:34:48+5:302014-10-20T05:34:48+5:30
भाजपाचे ज्येष्ठ आमदार आहेत. युती शासनाच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्ती. प्रदेशाध्यक्षपद भूषविले आहे
एकनाथ खडसे
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. युती शासनात कॅबिनेट मंत्रिपदाचा अनुभव गाठीशी. राज्य भाजपातील सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत. बहुजन समाजातून आलेले नेतृत्व असून, खान्देशमधील भाजपावर एकछत्री अंमल आहे. गडकरी-मुंडे अशा दोन्ही गटांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती न होण्यासाठी खलनायक म्हणून त्यांच्यावर टीका केली पण ते सेनेला पुरून उरले. त्याचमुळे आता शिवसेना त्यांना कसे स्वीकारते, हे महत्त्वाचे ठरेल.
विनोद तावडे
भाजपातील मराठा पण शहरी चेहरा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश. संघ, अभाविप, भाजपा असा प्रवास झाला आहे. नेते नितीन गडकरी यांचे निकटवर्ती मानले जातात. मुंडे गटाशी फारसे सख्य नाही. राजकीय डावपेच आखून आपले महत्त्व वाढविण्याचे कौशल्य साधले आहे. ते मुंबई भाजपाचे अध्यक्ष असताना महापालिकेत पक्षाची ताकद वाढविली. वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि मुंबई उद्योग वर्तुळात सलोख्याचे संबंध आहेत.
सुधीर मुनगंटीवार
भाजपाचे ज्येष्ठ आमदार आहेत. युती शासनाच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्ती. प्रदेशाध्यक्षपद भूषविले आहे. अभ्यासू आणि धडपड्या आमदार अशी ओळख. राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि त्याकरिता पाठपुरावा करण्यास प्रयत्नशील असतात. रा.स्व. संघाशी घनिष्ठ संबंध आहेत. ग्रामीण भागातील नेता. कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आहे.