अन् गावात चर्चा खासदार कोण होणार याचीच !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 06:25 PM2019-04-25T18:25:52+5:302019-04-25T18:29:35+5:30
चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्यात आतापर्यंत मतदान पार पडल्या आहेत. मतदान झालेल्या मतदारसंघात कोण निवडून येणार याची चर्चा पहायला मिळत आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार खासदार होणार याबाबत ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठात चर्चा रंगत आहे. गावातील पारावर आता मतांची जुळवाजुळवी सुरू झाली असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
ग्रामीण भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, शेतात कामे नसल्याने गावकरी गावच्या समाजमंदिर असो किंवा गावातील मुख्य ठिकाणी गप्पागोष्टीत रंगलेले पहायला मिळत आहे. गावात सध्या सर्वत्र निवडणुकीच्या चर्चा रंगत आहे. गावातील तरूण आणि वृद्ध यांच्यात मतांच्या जुळवाजुळवी वरून खटके उडत आहे. आपलाच नेता निवडून येणार असे ठासून सांगणारे कार्यकर्ते सुद्धा या चर्चेत सामील होत आहेत.
चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत. निवडणूक कोणतीही असली तरी सामान्य जनतेला आणि विशेषत: राजकीय आवड असलेल्या लोकांना मेजवानीच असते.
ग्रामीण भागात राजकारण प्रत्येकाच्या नसानसात भिनलेले आहे, याचा प्रत्येय येऊ लागला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. निकाल हाती येण्यासाठी अजून महिना लागणार आहे, मात्र तोपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्ते आप-आपली गणित माडंत आहे.