2024 च्या निवडणुकीत कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? फडणवीस म्हणाले, आमच्याकडे हुकुमाचा एक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 11:06 PM2022-11-05T23:06:15+5:302022-11-05T23:06:46+5:30
"एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रितपणे 2014 ची निवडणूक लढणार आहोत. चेहरा कोण असणार हे महत्वाचे नाही. कारण..."
एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रितपणे 2014 ची निवडणूक लढणार आहोत. चेहरा कोण असणार हे महत्वाचे नाही. कारण आणच्याकडे हुकुमाचा एक्का आहे तो म्हणजे मोदी जी आणि त्या चेहऱ्यामागे आपण कोणताही चेहरा लावा, सर्वच चेहरे पुढे जातात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले आहे. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
फडणवीस म्हणाले, आज आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हाही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. 2014 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस एकत्रितपणे निवडणूक लढू आणि संपूर्ण बहुमताने निवडून येऊ.
बेईमानीचा बदला घेतल्याचा आनंद -
यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्या आणि पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे कसलेही आश्वासन देण्यात आलेले नव्हते. एवढेच नाही, तर शिवसेनेवर बेईमानीचा आरोप करत, या बेईमानीचा बदला घेतल्याचा आपल्याला आनंद आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे श्रेही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. ते म्हणाले, आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यासोबत (एकनाथ शिंदे) ज्या पद्धतीचा व्यवहार होता, त्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता कुणी बाहेर पडत असेल आणि आम्हाला हे समजले, की ते बाहेर पडले आहेत, तर आम्ही काही असे तर म्हणणार नाही ना, की नको-नको शिंदे जी आपण परत जा आणि उद्धवजींसोबतच बसा. आम्ही तर असेच म्हणून, की फारच छान! बाहेर पडलात, आम्हालाही आमचा बदला घ्यायचा आहे. आम्ही आपल्याला साथ देण्यास तयार आहोत. तर हो आम्ही शंभरटक्के केलं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, की जी बेईमानी माझ्यासोबत झाली होती त्याचा बदला घेतला.