महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 12:49 PM2024-11-10T12:49:48+5:302024-11-10T12:50:53+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : आज (रविवार) मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने आपले संकल्प पत्र अर्थात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याच वेळी, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या अनेकांच्या मात असलेल्या प्रश्नावरही खुद्द अमित शाह यांनी भाष्य केले आहे. 

Who will be the next Chief Minister of Maharashtra Amit Shah clearly said, Pawar's name was also taken | महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!


सध्या राज्यात (महाराष्ट्रात) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी, सत्तेत आल्यानंतर आपण काय करणार? यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष मोठ मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करून आश्वासने देताना दिसत आहेत. यातच आज (रविवार) मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने आपले संकल्प पत्र अर्थात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याच वेळी, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या अनेकांच्या मात असलेल्या प्रश्नावरही खुद्द अमित शाह यांनी भाष्य केले आहे. 
 
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात बोलताना केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह म्हणाले, "सध्या महाराष्ट्रात युती सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे हे करत आहेत. ते आमचे मुख्यमंत्री आहेत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, यासंदर्भात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील." एवढेच नाही तर, आम्ही शरद पवारांना कुठलीही संधी देणार नाही," असेही शाह यांनी म्हटले आहे.

भाजपच्या संकल्पपत्रात काय? बघा संपूर्ण लिस्ट -
- लाडक्या बहिणींना पुढील काळात १५०० ऐवजी २१०० रुपये देणार
- शेतकऱ्यांसाठी भावान्तर योजना (हमीभावाने खरेदी होणार नाही, त्याठिकाणी फरकाची रक्कम खात्यात टाकणार)
- शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार
- प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क
- वृद्धांची पेन्शन २१०० (सहायतेच्या योजनांमध्ये वाढ करणार)
- जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार
- २५ लाख रोजगारांची निर्मिती 
- १० लाख विद्यार्थ्यांना वेतन
- गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौरचा वापर करुन ३० टक्के कमी करणार
-विज्ञान तंत्रज्ञान : मेक इन महाराष्ट्राला प्रभावीपणे राबवणार
- महाराष्ट्राला फिनटेक आणि एआयचं हब करू
- एअरोनॉटिकल आणि स्पेसमध्ये उत्पादनावर काम करू
- अक्षय अन्न योजना
- महारथी : एआय लॅब्स
- कौशल्य जनगणना करणार 
- छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र
- हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करत असेल तर भावात्तम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार
- अडीच वर्षांमध्ये १ लाखापेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या.

Web Title: Who will be the next Chief Minister of Maharashtra Amit Shah clearly said, Pawar's name was also taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.