कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:59 PM2024-10-30T17:59:27+5:302024-10-30T18:01:01+5:30

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल असे म्हणत राज यांनी 'त्या' नेत्याचे थेट नावही सांगितले आहे. एवढेच नाही तर, 2029 साठी विचाराल तर मी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे सांगेन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Who will be the next Chief Minister of Maharashtra Raj Thackeray said the name directly, made a big prediction | कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याचबरोबर, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? यावरही चर्चा होताना दिसत आहे. यातच आता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल, असे म्हणत राज यांनी 'त्या' नेत्याचे थेट नावही सांगितले आहे. एवढेच नाही तर, 2029 साठी विचाराल तर मी मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे सांगेन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ते एबीपी न्यूज हिंदीसोबत मुलाखतीदरम्यान बोलत होते. 

यावेळी, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "मला वाटते, पुढचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल. यावर पुन्हा विचारण्यात आले की, आपल्याला असे का वाटते? यावर राज म्हणाले "वाटते तर वाटते." राज ठाकरे पुढे म्हणाले, "जेव्हा 2029 मध्ये आपण मला हा प्रश्न विचाराल की, पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? तेव्हा मी सांगेन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल. माझी ही गोष्ट आपण लिहून ठेवा. 

यानंतर, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? याचे उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, "देवेंद्रजी (देवेंद्र फडणवीस) होतील." यावर, देवेंद्रजी होऊ शकतात पुढचे मुख्यमंत्री? आपल्याला असे वाटते? असे विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, "बिलकूल होऊ शकतात".    

...तर माझ्याकडेही धैर्य आहे -
यावेळी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे उदाहरण देत, "जर भाजप 1952 पासून ते 2014 पर्यंत थांबू शकते. शिवसेनाची स्थापना 1966 मध्ये झाली आणि 1995 मध्ये सत्तेत आली, तर माझ्याकडेही धैर्य आहे," असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 

Web Title: Who will be the next Chief Minister of Maharashtra Raj Thackeray said the name directly, made a big prediction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.