रिसोडच्या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार?
By admin | Published: May 14, 2014 10:16 PM2014-05-14T22:16:18+5:302014-05-14T22:35:40+5:30
औट घटकेसाठी असलेल्या रिसोड विधानसभा पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे.
रिसोड : औट घटकेसाठी असलेल्या रिसोड विधानसभा पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे. ३५ दिवस चाललेल्या तर्क वितर्कांच्या चर्चेला उद्या १६ मे रोजी मतमोजणीनंतर पूर्णविराम मिळणार आहे. माजी मंत्री सुभाषराव झनक यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या चार महिन्यासाठी रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लोकसभेसोबत जाहीर झाला आणि १0 एप्रिलला मतदान प्रक्रिया पुर्ण झाली आहे. यामध्ये २ लाख ८२ हजार ६५९ मतदारांपैकी १ लाख ६६ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी ५८.९१ टक्के मतदान झाले. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रबळ तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने अमित सुभाषराव झनक तर भाजपाच्यावतीने माजी आमदार अँड. विजयराव जाधव, भारीप वतीने माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्किृत नगरसेवक किरणराव क्षिरसागर यांचा समावेश होता. मागील निवडणुकीत काँग्रेसचे सुभाषराव झनक यांना ५२ हजार व अपक्ष अनंतराव देशमुख यांना ४९ हजार मते मिळाली होती. तर ३९ हजार ५00 मते भाजपचे विजयराव जाधव यांना प्राप्त झाली होती.या निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी ६५ हजार मतांची आवश्यकता आहे. ही निवडणूक कोण जिंकणार हे मात्र १६ मे च्या मतमोजणी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.