मुंबई, ठाणे, रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केली जिल्हानिहाय यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 08:10 IST2025-01-20T08:09:59+5:302025-01-20T08:10:08+5:30

Republic Day News: प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९:१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

Who will hoist the flag in Mumbai, Thane, Raigad? The Protocol Department has released a district-wise list | मुंबई, ठाणे, रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केली जिल्हानिहाय यादी

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केली जिल्हानिहाय यादी

 मुंबई -  प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९:१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी सकाळी ८:३० ते १० यादरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबईतील मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण व संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करणार असून त्याची जिल्हानिहाय यादी राजशिष्टाचार विभागाने जारी केली आहे. सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत. ध्वजारोहण प्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना समारंभास निमंत्रित करावे, असेही राजशिष्टाचार विभागाने कळविले आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण 
ठाणे    एकनाथ शिंदे
पुणे    अजित पवार
नागपूर    चंद्रशेखर बावनकुळे 
अ. नगर    राधाकृष्ण विखे पाटील 
वाशिम    हसन मुश्रीफ 
सांगली    चंद्रकांत पाटील 
नाशिक    गिरीश महाजन 
पालघर    गणेश नाईक 
जळगाव    गुलाबराव पाटील 
यवतमाळ    संजय राठोड 
मुंबई शहर    मंगलप्रभात लोढा 
मुंबई उपनगर    आशिष शेलार 
रत्नागिरी    उदय सामंत 
धुळे    जयकुमार रावल 
जालना    पंकजा मुंडे 
नांदेड    अतुल सावे 
चंद्रपूर    अशोक उईके 
सातारा    शंभुराज देसाई 
बीड    दत्तात्रय भरणे 
रायगड    अदिती तटकरे 
लातूर    शिवेंद्रसिंह भोसले  
नंदुरबार    माणिकराव कोकाटे 
सोलापूर    जयकुमार गोरे 
हिंगोली    नरहरी झिरवाळ 
भंडारा    संजय सावकारे 
छ. संभाजीनगर    संजय शिरसाट 
धाराशिव    प्रताप सरनाईक 
बुलढाणा    मकरंद पाटील 
सिंधुदुर्ग    नितेश राणे 
अकोला    आकाश फुंडकर  
गोंदिया    बाबासाहेब पाटील  
कोल्हापूर    प्रकाश आबिटकर  
गडचिरोली    आशिष जयस्वाल  
वर्धा    पंकज भोयर 
परभणी    मेघना बोर्डीकर 
अमरावती    इंद्रनील नाईक 

Web Title: Who will hoist the flag in Mumbai, Thane, Raigad? The Protocol Department has released a district-wise list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.