दारुल कझाची चौकशी कोण करणार? - हायकोर्ट
By admin | Published: March 20, 2016 02:30 AM2016-03-20T02:30:31+5:302016-03-20T02:30:31+5:30
न्यायव्यवस्थेला समांतर चालणारी ‘दारुल कझा’च्या कामकाजाची चौकशी कोण करणार? यामध्ये खरोखरच न्यायालयासारखे कामकाज चालते का, याची चौकशी करण्याची
मुंबई : न्यायव्यवस्थेला समांतर चालणारी ‘दारुल कझा’च्या कामकाजाची चौकशी कोण करणार? यामध्ये खरोखरच न्यायालयासारखे कामकाज चालते का, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारचा कोणता अधिकारी याची चौकशी करेल? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.
दारुल कझाला न्यायनिवाडा करण्याचा अधिकार नसतानाही या ठिकाणी दिवाणी दावे आणि विवाहाच्या केसेस दाखल करण्यात येतात. दारुल कझा घटनेविरुद्ध आहे, त्यामुळे राज्यातील सर्व दारुल कझा बंद करण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नाझीर नूर अली यांनी दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)