असाह्य महिलांची हाक ऐकणार कोण?

By admin | Published: November 25, 2015 04:07 AM2015-11-25T04:07:59+5:302015-11-25T04:07:59+5:30

संकटात सापडलेल्या महिलांच्या हाकेला धावून जाण्यासाठी पोलीस खात्याने हेल्पलाइन सुरू केली खरी; परंतु या दूरध्वनी सुविधेवर साह्य मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

Who will listen to the unfortunate females? | असाह्य महिलांची हाक ऐकणार कोण?

असाह्य महिलांची हाक ऐकणार कोण?

Next

मुंबई : संकटात सापडलेल्या महिलांच्या हाकेला धावून जाण्यासाठी पोलीस खात्याने हेल्पलाइन सुरू केली खरी;
परंतु या दूरध्वनी सुविधेवर साह्य मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आता कुणाकडे मदतीचा हात मागावा, असा प्रश्न महिलांना पडला आहे. ‘लोकमत’ने राज्यभरात केलेल्या स्टिंगमधून हे वास्तव समोर आले आहे.
२५ नोव्हेंबर हा जागतिक महिला अत्याचारविरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्त लोकमतने जिल्ह्णा- जिल्ह्णात स्टिंग आॅपरेशन केले. त्याअंतर्गत महिलांच्या साहाय्यासाठी शासनाने सुरू केलेल्या १०३ आणि १०९१ या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क करून ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार नोंदविली आणि त्यावर पोलिसांच्या प्रतिसादाची नोंद केली.
मुंबईसारख्या महानगरात १०३ या महिला साहाय्यता क्रमांकावर संपर्क करून मदत मागणाऱ्या लोकमतच्या प्रतिनिधीला हद्दीची कारणे दाखवून मदत नाकारण्यात आली. तसेच साताऱ्यात एका महिलेवर अत्याचार होत असल्याची माहिती सांगण्यासाठी संपर्क केला असता, तिथेही अन्य
ठिकाणी संपर्क करायला सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सिंधुदुर्गातसुद्धा तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याऐवजी अन्य पोलीस अधिकाऱ्याचा क्रमांक देऊन तेथे संपर्क करण्यास सांगण्यात आले. लातूरमध्ये अनेक वेळा हेल्पलाइनवर
कॉल करूनसुद्धा फोन उचलण्यात आला नाही. तर हिंगोली,
गोंदिया जिल्हह्णांत महिला साहाय्यता क्रमांक सुरूच नसल्याचे आढळले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महिलांसाठी उपलब्ध असलेल्या या क्रमांकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यातही शासन यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून आले.
शाळा-महाविद्यालयांतील तरुणी तसेच महिलांना हेल्पलाइनबद्दल माहितीच नसल्याचे उघडकीस आले. मुंबईवगळता अन्य ठिकाणी या क्रमांकांवर मदतीसाठी येणाऱ्या कॉलच्या संख्येवरूनही ते सिद्ध झाले.
मुंबईत हेल्पलाइनवर महिन्याकाठी १५ ते १६ हजार कॉल येतात. परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ महिन्यांत या क्रमांकावर केवळ ११ तक्रारी, जालन्यात गेल्या वर्षभरात केवळ ८ तक्रारी, नांदेडमध्ये दरमहा १० ते १२ तक्रारी, सोलापूरमध्ये ११ महिन्यांत ७४ तक्रारी, तर वर्ध्यात वर्षभरात केवळ ८ तक्रारी या क्रमांकावर नोंदविण्यात आल्या.

Web Title: Who will listen to the unfortunate females?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.