सफाळे स्थानकातील कचरा कोण उचलणार?
By admin | Published: January 7, 2017 03:17 AM2017-01-07T03:17:48+5:302017-01-07T03:17:48+5:30
सफाळे रेल्वे स्टेशन लगत साचलेल्या कचऱ्यामुळे तेथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो
शुभदा सासवडे,
सफाळे- सफाळे रेल्वे स्टेशन लगत साचलेल्या कचऱ्यामुळे तेथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आहे. या स्वच्छते संदर्भात रेल्वे व ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांच्या कडे बोट दाखवून वेळकाढूपणा करत आहेत.
सफाळे स्टेशन परिसरात रोज भ रत असेलेल्या भाजी मंडईचा कचरा इतरत्र फेकला जातो. भाजीपाल्याचा हा कचरा ओला असल्याने काही तासांत कुजुन त्यातुन दुर्गंधी सुटत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास होतो.
हा कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाड्या येतात परंतु इथे असलेल्या वाहनतळाच्या अडथळ्यामुळे हा कचरा उचला जात नाही असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. या उलट या परिसरात हातगाड्या लावणाऱ्यां कडून ग्रामपंचायत कर वसूल करते म्हणून तो कचरा ग्रामपंचायतीनेच उचलायला हवा असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. दोन्ही प्रशासनाच्या या जबाबदारी न घेण्याच्या वृत्तीमुळे प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच या भागातून येजा करावी लागत आहे. (वार्ताहर)
>प्रशासकीय लालफित
रेल्वे प्रशासना मार्र्फत या अनिधकृत वाहनतळा संबंधित सफाळे पोलिसांना अलीकडेच तक्रारही केली आहे. यावर संबंधीत वाहने उभी राहत असलेली जागा पोलिस हद्दीत येत नसल्यामुळे अनधिकृत वाहनतळाविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाही होत नसल्याचे चित्र आहे.